"पुराव्यांचा अभाव की तपासाची दिशा बदलली? नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपीला CBI कडून दिलासा मिळाल्याने शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे."
नवी दिल्ली : नीट पेपर फुटीप्रकरणी जबाबदारी स्विकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जेन झी तरुणांचं जोरदार आंदोलन सुरु आहे.
त्यातच आता नीट प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपीला सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. हे प्रकरण यंदाच्या NEET-UG 2026 पेपर लीकचं प्रकरण नाही. तर NEET-UG 2024 पेपर लीकचं आहे. या प्रकरणी चौकशी करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (सीबीआय) मुख्य आरोपी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला क्लीनचीट दिली आहे. सीबीआयनं गुरुवारी सांगितलं की, पेपर फोडणाऱ्या टोळीच्या या कथित म्होरक्या विरोधात NEET-UG 2024 पेपर चोरी करणं किंवा ते वाटण्याबाबत कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. या मुख्य आरोपीवर बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.
सीबीआयनं नेमकं काय म्हटलं?
सीबीआयनं एका निवेदनात म्हटलं की, "बिहार पोलिसांनी २०२४ मध्ये NEET-UG प्रश्नपत्रिका चोरीची माहिती मिळाल्यानंतर इतर परीक्षांच्या पेपरलीक प्रकरणात सहभाग असल्याचं सांगत या व्यक्तीचं नाव एफआयआरमध्ये नोंदवलं होतं. पण नंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं. या संजीव कुमारची सीबीआयनं पुन्हा नव्यानं चौकशी केली. तसंच चोरीमध्ये सहभागी सर्व लोकांची, चोरण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचं वाटप आणि लाभार्थ्यांची ओळख पटवली होती.सीबीआयनं सांगितलं की, पटना येथील कोर्टात ४५ लोकांविरोधात आरोपपपत्र दाखल केलं. पण यांपैकी नीट पेपर लीकच्या कटात संजीव कुमारचा हात असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. आधी आरोपी फरार होता, नंतर बिहार पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सीबीआयनं चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं, पण त्याचा यात काही हात असल्याचं पुरावा मिळू शकला नाही. त्यामुळं संजीव कुमारला या प्रकरणात जामीन मिळाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.