🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षादेखील रद्द

मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षादेखील रद्द


दिल्लीत जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणात आंदोलन सुरु असून ही लाट आता देशभरात पसरली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाले आहेत. अशातच उत्तराखंडातून मोठी बातमी आली आहे. उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील दोन पेपर फुटले आहेत. त्यामुळे विद्यापीठावर परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिक्षक आशीष कुमार यांना अटक केली आहे. ते शिवालिक कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तर ते प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या टीममध्ये होते. शिक्षक आशीष कुमार यांनी परीक्षेतील प्रश्नांसारखेच प्रश्न एका कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना पाठवला असा आरोप आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.