🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"या मुलांना असंच..."; NEET परीक्षा आंदोलनातील पोलीस लाठीमारावर अभिनेता समीर चौगुलेची वादळी पोस्ट वायरल!

​"या मुलांना असंच..."; NEET परीक्षा आंदोलनातील पोलीस लाठीमारावर अभिनेता समीर चौगुलेची वादळी पोस्ट वायरल!


मुंबई: दिल्लीच्या जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी घोटाळ्याविरोधात पेटलेला रणसंग्राम आता अधिकच आक्रमक झाला आहे. संसदेवर धडक देणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. 
या भयंकर कारवाईवर मनोरंजन विश्वातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच हळवी पोस्ट शेअर केली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायावर भाष्य करताना त्यांनी समाजाच्या विकृत मानसिकतेवर थेट हल्ला चढवला आहे.

असंवेदनशील मानसिकतेच्या लोकांना समीर चौघुलेंचा सवाल

समीर चौघुले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, "आता एकाची पोस्ट वाचली..,.."परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे..जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार" ……सुन्न झालो…आपण माणसे नाही राहिलो…झोंबी झालो आहोत ..हा कोणता "उन्माद" भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात…त्या तरुण कोवळ्या मुला मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एंजॉय करत असतील किंवा "असंच पाहिजे या मुलांना" हा आनंद त्यांना होत असेल तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय….प्रत्येक गोष्ट संवादाने १०० टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती …तरुण कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेने बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात ..कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये .……मुलांचे म्हणणं, समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे…"

त्यांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांची जळजळीत मुद्द्यांमध्ये खरडपट्टी काढली. ते म्हणाले, "काही टिप्स- १) कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे नको त्या भानगडीत पडू नये वगैरे सूचना द्यायला जाऊ नये …तुम्हाला सर्वांना तोच नियम लागू पडतो ..मी ही तुमच्या सारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्ही ही हिरिरीने मत मांडता, मी ही मांडतोय….२) पहलगामच्या वेळी काय वाचा बसली होती का? - त्या ही वेळी व्यक्त झालोच होतो…. त्यामुळे त्या वेळी का नाही बोललात केटेगरीत बोलू नये. ३) तुम्हाला आजपासून unfollow करतो - जशी आपली इच्छा ..आनंदी रहा तुमच भल होऊ दे …फक्त शांतपणे अनफॉलो करा..कमेंट करून सांगू नका ४) मनातील द्वेषाचा निचरा मोकळा करायला वेगळी जागा शोधा ..गलिच्छ शिवराळ हिणकस भाषा कृपया इथे वापरू नका …५) किती पैसे मिळाले या पोस्ट साठी? - तुम्हाला मिळतात त्या पेक्षा थोडे जास्त" समीर चौघुले यांच्या या बिनधास्त आणि परखड भूमिकेचे सध्या सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत असून, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.