दिल्ली: 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे. लोक 30 दिवसांहून अधिक काळ इथे ( जंतर मंतरवर) बसले आहेत. विद्यार्थ्यांची डोकी फोडली. आम्ही नाही तर तेच राजकारण करत आहेत. आम्ही तर म्हणतो कि त्यांनी राजकारण करावं, राजकारणात आपण लोकांसाठी काम करतो, लोकांचं म्हणणं ऐकतो. मला एक कळत नाही, सरकारच्यामनात नेमकं काय आहे. लाखो लोक इथे जमले आहे. सरकारच्या विरोधात किती निराशा आहे.
केवळ इथेच नाहीतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहे. जेव्हापासून दिल्ली पोलिसांनी लाठी चार्ज केला, लोकांची डोकी फोडलीयावरून अनेकविरोधी प्रतिक्रिया उमटत आहे. ऐरवी बोलत असतात कि चाणक्यनीती आहे, तर काय हि तुमची चाणक्यनीती आहे का? असे असेल तर तुम्ही दूर व्हा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा वाटाघाटीचा विषय नाही. त्याशिवाय आंदोलन सुरूच राहील. जोपर्यंत ते सुरू ठेवावे लागेल, तोपर्यंत ते सुरूच राहील." असा इशारा देत कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सरकारवर टीका केली आहे.
सत्ताधारी पक्षाने पेरलेले समाजकंटक घुसखोरी करून संपूर्ण आंदोलन भरकटवतात, CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास पुढेम्हणाले म्हणाले की, "मी आज सोनम वांगचुक यांच्याशी अनेकदा बोललो. या शांतता पूर्ण आंदोलनाने शांतता पूर्णच राहिले पाहिजे, असा निष्कर्ष निघाला. त्यांनी सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि हे आंदोलन योग्य रीतीने करण्याचे जाहीर आवाहनही केले आहे. या देशातील पूर्वीच्या आंदोलनांमध्ये सत्ताधारी पक्षाने पेरलेले समाजकंटक घुसखोरी करून संपूर्ण आंदोलन भरकटवतात, आणि मग शेवटी शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच दोष दिला जातो, आणि असे होता कामा नये."
जेपी नड्डा नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी बुधवारी (22 जुलै) पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थी आंदोलने, विरोधी पक्ष, सोनम वांगचुक आणि संसदेतील चर्चा यासह अनेक विषयांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, विद्यार्थी आंदोलनाचे राजकारण करू नये. त्यांनी काँग्रेसवर राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.तर केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, सरकार नीट (NEET) संबंधित मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की, विरोधी पक्षांनी चर्चेसाठी वेळ निश्चित करावी. आम्ही ठरलेल्या वेळेत अर्थपूर्ण चर्चेसाठी तयार आहोत. यासर्व मुद्द्यांवर आता CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.