🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यसभा खासदाराच्या मुलाचा पराक्रम! 3 सेकंदात 100 ची स्पीड अन् भर चौकात सेल्स गर्ल महिलेला उडवलं, 8.85 कोटींची गाडी जप्त!

राज्यसभा खासदाराच्या मुलाचा पराक्रम! 3 सेकंदात 100 ची स्पीड अन् भर चौकात सेल्स गर्ल महिलेला उडवलं, 8.85 कोटींची गाडी जप्त!


आंध्रप्रदेशमधील जनसेना पक्षाते नेते आणि राज्यसभा खासदार लिंगमनेई रमेश यांच्या मुलाने 26 वर्षाच्या सेल्स गर्ल महिलेला एस्टॉन मार्टीन सुपरकार गाडीने उडवल्याची घटना समोर आली आहे. तपासादरम्यान, अपघाताच्या वेळी ती कार चालवणारी व्यक्ती लिंगमनेनी रमेश यांचा मुलगा, 21 वर्षीय लिंगमनेनी संजुश असल्याचं निष्पन्न झालं. त्याच दिवशी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुपारच्या तीनच्या सुमारास हा अपघात घडला. भारती आणि त्यांच्या सहकारी जवळच्या हॉटेलमध्ये पार्सल कलेक्ट करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परत येत मॉलमध्ये येत असताना हा अपघात झाला. रस्ता क्रॉस करत असताना भारती मुखी यांना भरधाव कारने धडक दिली अन् त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथं त्यांची प्राणज्योत मालवली. हैदराबाद पोलिसांनी 'ॲस्टन मार्टिन' (Aston Martin) ही कार जप्त केली आहे.

ॲस्टन मार्टिन कार 21 वर्षांचा लिंगमनेनी संजुश चालवत होता. लिंगमनेनी संजुश हा व्यावसायिक आणि जनसेना पक्षाचे राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा मुलगा आहे. भारती मुखी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता; त्यांना तातडीने जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर आता खासदाराच्या मुलाला अटक होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
एस्टन मार्टिन कारची वैशिष्ट्य

एस्टन मार्टिन ही एक प्रसिद्ध ब्रिटिश लक्जरी स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी आहे. या कार त्यांच्या उत्कृष्ट डिझाइन, उच्च वेग (अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स), आणि व्लक्सरी इंटीरियरसाठी जगभरात ओळखल्या जातात. भारतातील बाजारपेठेत या ब्रँडची किंमत साधारणपणे 3.15 कोटी ते 8.55 कोटी रुपयांपर्यंत असते. नवीन मॉडेल्स जसे की Vanquish काही सेकंदांतच 0 ते 100 किमी/तास वेग पकडतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.