🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला

नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला

नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या ३४ वर्षीय रूपाली पाटील यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली आणि वाहनाच्या खाली येऊन रुपाली यांचा मृत्यू झाला, असा सुरुवातीला संशय होता.


संशयित प्रियकराला अटक

रूपाली यांच्याशी वाद झाल्यानंतर संशयित दीपक सैंदाणे याने कारने पाठीमागून धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे.

कारमध्येच संशयिताचे मद्यपान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली नीलेश पाटील (३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) यासिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. कंपनीच्या कामानिमित्त मित्र तथा प्रियकर दीपक सैंदाणे (४३, रा. अंबड) याच्यासोबत कारने वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असताना दीपकने कारमध्येच मद्यपान केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दोन वर्षांपासून प्रेमसंबंध, चौकशीत गुन्ह्याची कबुली

रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे झटापटीत रूपांतर झाले. त्यानंतर रूपाली कारमधून उतरून
रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा मृत्यू झाला. रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली.
अपघात असल्याचे सुरुवातीला भासले

घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे भासत होते. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तत्काळ ताब्यात घेतले. कसून चौकशीत रूपाली आणि आपले मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.