हॉटेलचं जेवण ऑर्डर केलं, पण तेच शेवटचं ठरलं, 5 वर्षांच्या आर्याचा जीव गेला, कुटुंबाचीही मृत्यूशी झुंज!
सुरत :- 15 ऑगस्टचा दिवस, घरातील सगळ्यांना सुट्टी असल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, पण याच आनंदावर पुढच्या काही तासांमध्ये विरजण पडलं. शनिवारी रात्री कुटुंबातील सदस्यांच्या आग्रहामुळे रेस्टॉरंटमधून जेवण मागवण्याचं ठरलं, पण हेच जेवण अख्ख्या कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे.
रेस्टॉरंटमधल्या या विषारी खाण्यामुळे 5 वर्षांच्या आर्याचा मृत्यू झाला आहे, तर कुटुंबातील इतर चार जण रुग्णालयात आयुष्याशी झुंज देत आहेत. या सगळ्यांना फूड पॉयझनिंग झाल्यानंतर त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात भरती करण्यात आलं.
शनिवार 15 ऑगस्टच्या दिवशी रात्री कुटुंबाने शीतल रेस्टॉरंटमधून जेवणं मागवलं, पण रेस्टॉरंटमधील हे जेवण जेवल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडायला सुरूवात झाली. पुढच्या काही तासांमध्ये कुटुंबातील प्रत्येकाची प्रकृती गंभीर झाली, त्यामुळे सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
मुलीचा मृत्यू, चौघांवर उपचार सुरू
रुग्णालयात आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलींवर उपचार सुरू आहेत, पण सगळ्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तर उपचारादरम्यान 5 वर्षांच्या आर्याचा मृत्यू झाला. घरातल्या मुलगी गेल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे.
रेस्टॉरंट सील
फूड पॉयझनिंगच्या या घटनेनंतर पोलीस आणि आरोग्य विभागाने सूरतमधील शीतल रेस्टॉरंट सील केलं आहे. रेस्टॉरंटमध्ये विकलं जाणारं खाणं आणि तिथल्या साफ-सफाईसह इतर व्यवस्थांची तपासणी केली जात आहे. तर कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
रेस्टॉरंट सील
फूड पॉयझनिंगच्या या घटनेनंतर पोलीस आणि आरोग्य विभागाने सूरतमधील शीतल रेस्टॉरंट सील केलं आहे. रेस्टॉरंटमध्ये विकलं जाणारं खाणं आणि तिथल्या साफ-सफाईसह इतर व्यवस्थांची तपासणी केली जात आहे. तर कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.रेस्टॉरंटमधून जेवण मागवल्यानंतर घरातील सगळ्यांची तब्येत बिघडल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. आता तपासानंतरच कुटुंब आजारी का पडलं? रेस्टॉरंटमधून आणलेल्या जेवणामध्ये नक्की काय होतं? याचं खरं कारण समोर येईल. दरम्यान आरोग्य विभागाने रेस्टॉरंट सील केल्यानंतर तिथलं खाण्याचं सॅम्पल पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं आहे, पण फूड पॉयझनिंगच्या या घटनेमुळे सूरतमध्ये खळबळ माजली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.