🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?' RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा

वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?' RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा


छत्रपती संभाजीनगर : 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक आणि नवी दिल्लीतील आंदोलनाचे सूत्रधार अभिजित दिपके यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीवरून आणि पक्षाच्या फंडिंगवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं केली असून, यावर चौकशी होईल न होईल परंतू अभिजित दिपके यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधील आपल्या उच्च शिक्षणाचा खर्च शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जातून पूर्ण झाल्याचं दिपके यांनी स्पष्ट केलं आहे.
आरटीआय कार्यकर्त्याचा प्रश्न काय?

सुरत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारसह विविध प्रशासकीय विभागांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिजित दिपके यांचे वडील भगवानराव दिपके हे MIDC मधून ज्युनिअर इंजिनिअर पदावरून निवृत्त झाले आहेत. 'महिन्याला अवघा 60 ते 65 हजार रुपये पगार घेणारा एक मध्यमवर्गीय सरकारी कर्मचारी आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी थेट अमेरिकेसारख्या महागड्या देशात कसा काय पाठवू शकतो?, असा सवाल त्यांनी केला होता. यावर अभिजित दिपके यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

'ते लोन मला फेडायचंय'
ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'मी अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा केला? याची अनेकांना उत्सुकता आहे. माझ्या बोस्टन युनिव्हर्सिटीतील शिक्षणाचा मोठा खर्च मला मिळालेल्या स्कॉलरशिपमुळे भागला. उर्वरित खर्चासाठी मी बँक एज्युकेशन लोन घेतलं होतं, जे मला आता फेडायचं आहे,' असं दिपके यावेळी म्हणाले. पक्षाच्या भवितव्यातील फंडिंगबाबत बोलताना त्यांनी सांगितलं केलं की, 'सीजेपीचे काम क्राउडफंडिंगद्वारे चालेल आणि लोकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशोब ठेवला जाईल'. जंतर-मंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करताना दिपके यांनी दावा केला की, 'काही दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे आम्हाला पाण्याच्या बाटल्या आणि मदत दिली. 'आमची मुलेही नीट परीक्षेची तयारी करत आहेत, त्यामुळे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे', असं त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं.'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.