वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. जगात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया सुरू असताना AIच्या मदतीने मेंदूची नाजूक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
या शस्त्रक्रियेमुळे एका 48 वर्षीय रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश आले.
कुठे पार पडली शस्त्रक्रिया?
ब्रिटनमधील National Hospital for Neurology and Neurosurgery (NHNN), UCLH येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. UCLच्या संशोधकांनी विकसित केलेल्या AI तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करण्यात आला. हे तंत्रज्ञान वैद्यकीय चाचणीचा भाग असून त्यासाठी NIHRकडून निधी देण्यात आला आहे.
बे़डफर्डशायर येथील Rhys Hibbert (48) यांच्या मेंदूमध्ये ट्यूमर होता. या ट्यूमरमुळे त्यांच्या दृष्टीला धोका निर्माण झाला होता. शस्त्रक्रिया न केल्यास पुढे त्यांची दृष्टी जाऊ शकली असती. मात्र, डॉक्टरांनी यशस्वीपणे ट्यूमर काढला आणि त्यांची दृष्टी सुरक्षित ठेवली. या पद्धतीने AIच्या मदतीने शस्त्रक्रिया करून घेणारे Rhys हे पहिले रुग्ण ठरले आहेत.
शस्त्रक्रियेदरम्यान AIने कशी मदत केली?
शस्त्रक्रिया सुरू असताना AIने थेट सर्जिकल व्हिडिओचे विश्लेषण केले. मेंदूच्या तळाशी असलेल्या महत्त्वाच्या रचना ओळखण्यासाठी AIने डॉक्टरांना मदत केली. या भागात पिट्यूटरी ग्रंथी, रक्तवाहिन्या आणि दृष्टी नियंत्रित करणाऱ्या नसांचा समावेश असतो. हे भाग एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान अगदी काही मिलिमीटरची चूकही गंभीर ठरू शकते.
AIने डॉक्टरांना कोणते भाग धोकादायक आहेत हे ओळखण्यास मदत केली. त्यामुळे ट्यूमरचा जास्तीत जास्त भाग काढताना महत्त्वाच्या नसांना आणि इतर रचनांना इजा होऊ नये, यासाठी मदत मिळाली.
हे AI तंत्रज्ञान UCL Hawkes Instituteमधील संशोधकांनी विकसित केले आहे. यासाठी शेकडो जुन्या शस्त्रक्रियांचे व्हिडिओ वापरून AIला प्रशिक्षण देण्यात आले. भविष्यात अशा तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टरांना रिअल-टाइम माहिती आणि मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.