🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"तुम्ही भाजपचे आहात का?" – पीडित पोलिस कुटुंबाच्या प्रश्नावर राहुल गांधींचा पारा चढला; पत्रकार परिषदेत जोरदार खडाजंगी!

​"तुम्ही भाजपचे आहात का?" – पीडित पोलिस कुटुंबाच्या प्रश्नावर राहुल गांधींचा पारा चढला; पत्रकार परिषदेत जोरदार खडाजंगी!


दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेत नीट आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "तुम्ही भाजपाचे आहात का?", असा प्रश्न पत्रकाराला केला. संसद परिसरात राहुल गांधींना पत्रकार परिषदेबाबत प्रश्न विचारला असताना त्यांनी असे विधान केले.

तुम्ही भाजपाचे आहात का? राहुल गांधींचा प्रश्न

संसदेच्या परिसरात काँग्रेसह विरोधी पक्षाकडून आज राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी अनोख्या पद्धतीने निदर्शन करण्यात आले. राहुल गांधी संसद परिसरातच असताना एका पत्रकाराने त्यांना दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी "तुम्ही भाजपाचे आहात का?", असा प्रतिप्रश्न पत्रकाराला केला. 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद
आज पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. नीट आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली. अनेक अधिकारी अजून वैद्यकीय उपचार घेत आहेत असे पत्रकार परिषेदत बोलताना कुटुंबीय म्हणाले. पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लेक्ष केलं जात असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले. दिल्ली पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या मुलींने त्यांच्या वडिलांना जमावाकडून मारहाण केल्याचा आरोप केला.
कुटुंबीयांचे आरोप

जंतर मंतरच्या जवळ वडिलांना जमावाने खेचले आणि मारहाणा केली. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार त्यांना शुद्ध नव्हती, असे मुलीने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांना यावेळी केली. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थींची ओळख पटवून त्यांना सोडण्यात यावे असेही पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय म्हणाले.

उच्चस्तरीय चौकशी समितीची मागणी
आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? असा विरोधकांकडून विचारला जात आहे. राहुल गांधींनी यावरुन गृहममंत्र्यांवर टीका केली. दरम्यान, गुरुवारी राहुल गांधींनी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र उच्चस्तरीय समिती चौकशी स्थापन करण्याची मागणी केली. २० जुलैच्या लाठीचार्ज प्रकरणी पारदर्शक तपासाची मागणी राहुल यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.