🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

थलापती विजयला मोठा धक्का! राज्यभरातून 'जन नायकन'चे शो हटवले, अभिनेत्याचे पोस्टरही फाडले; नेमकं प्रकरण काय?

थलापती विजयला मोठा धक्का! राज्यभरातून 'जन नायकन'चे शो हटवले, अभिनेत्याचे पोस्टरही फाडले; नेमकं प्रकरण काय?


कर्नाटक: साऊथ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलापती विजय यांचा राजकारणात येण्याआधीचा शेवटचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे आणि चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. मात्र, असं असतानाच थलापती विजयला एक मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक राज्यात 'जन नायकन'चे शो तातडीने थांबवण्यात आले असून, अनेक थिएटर्समधून विजयचे पोस्टर्स आणि कट-आऊट्स हटवण्यात आले आहेत. 
कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेला वाद आता पेटल्याचे दिसत आहे. या राजकीय आणि प्रादेशिक संघर्षाचा थेट फटका दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या 'जन नायकन' या चित्रपटाला बसला आहे. कर्नाटकातील कन्नड संघटना आणि शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभरात 'जन नायकन'चे शो तातडीने थांबवण्यात आले आहेत.
संपूर्ण राज्यातून हटवला 'जन नायकन' 

२३ जुलै रोजी प्रदर्शित झालेला 'जन नायकन' हा चित्रपट कर्नाटकातील तब्बल ७५ हून अधिक सिंगल स्क्रीन आणि ५० हून अधिक मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, कावेरी आंदोलनाची धग वाढताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चित्रपटगृह मालकांनी स्वतःहून शो रद्द केले.

बंगळुरूच्या प्रसिद्ध 'उर्वशी' थिएटरबाहेर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर विजयचे सर्व पोस्टर्स काढून तिथे 'कारावली' हा कन्नड चित्रपट लावण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उर्वशी थिएटरबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला मंड्या जिल्ह्यात कन्नड कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून विजयचे बॅनर्स फाडून टाकले.

कशामुळे वाद पेटला?
कावेरी वॉटर रेग्युलेशन कमिटीच्या (CWRC) शिफारशीनुसार तमिळनाडूला पुढील १५ दिवस दररोज ३,५०० क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटकात आधीच पाण्याची तीव्र टंचाई असताना तमिळनाडूला पाणी सोडल्यास स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असा आक्रमक पवित्रा कन्नड संघटनांनी घेतला आहे. तर दुसरीकडे, तमिळनाडूतील काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी बोर्डाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. या राजकीय वादात आता थलपती विजयचा सिनेमा पुरता भरडला गेला असून कर्नाटक फिल्म चेंबरने यावर तातडीची बैठक बोलावली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.