🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खिशात आढळली धक्कादायक चिठ्ठी! ७ कोटींची फसवणूक झाल्याने इचलकरंजीत तरुण अभियंत्याची आत्महत्या

खिशात आढळली धक्कादायक चिठ्ठी! ७ कोटींची फसवणूक झाल्याने इचलकरंजीत तरुण अभियंत्याची आत्महत्या


इचलकरंजी: आर्थिक फसवणुकीच्या नैराश्येतून तरुण अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज अरुण निर्मळे (वय ३४, इंदिरानगर, कोरोची) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या सतीश पाटील यांच्या शेतामधील खोलीत घडली.

याबाबतची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. तपासात पोलिसांना सूरज याच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. त्यात सात कोटींच्या फसवणुकीच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी सूरजने लहान भाऊ दीपक यांना व्हॉट्स अॅपद्वारे लोकेशन शेअर केले. त्यामध्ये आत्महत्येमागील कारण चिठ्ठीमध्ये लिहून पाठविल्यानंतर मोबाईल बंद केला. भाऊ दीपक हे कामानिमित्त परगावी होते. त्यांनी घराशेजारील मुलांना लोकेशननुसार सूरज याचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या शेतातील घरात सूरज याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी दीपक हे घटनास्थळी आले. याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना दिली. 

पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी सूरजच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी आढळली. सात कोटी रुपये एकास दिले होते. वारंवार पैसे मागूनही तो परत देण्यास तयार नव्हता. दमदाटी करून कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता, असा चिठ्ठीत मजकूर आढळून आला. त्यानुसार शहापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सूरज याच्या बँक व्यवहाराची माहिती पोलिस घेत आहेत. याबाबतची वर्दी चेतन बाळकृष्ण पाटील (वय ३६) यांनी पोलिसांत दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.