🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती


महसूल विभागाने पदोन्नतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. तर २२ नायब तहसिलदारांची तहसीलदार पदावर वर्णी लागली आहे. गेल्या वीस वर्षापासून रखडलेल्या पदोन्नतीबाबत महसूल विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

बावनकुळे म्हणाले की, मी महसूल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आज जवळपास चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचे डेप्युटी कलेक्टरचे प्रमोशन झाले आहे. तर २२ नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. या राज्यात आतापर्यंत या दीड वर्षात साडेनऊशे अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले आहेत. महसुली अधिकाऱ्यांचं प्रमोशन गेल्या २० वर्षांपासून थांबलेले होते, आमच्या कार्यकाळात ते मार्गी लागलेले आहे.

सहकारी संस्था जमीन हस्तांतरणावर प्रतिक्रिया
मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यात आदर्श घोटाळा झाल्यानंतर महसूल विभागाच्या जागेवर सोसायट्यांना जागा देण्याची पॉलिसी नव्हती. काल मी प्रेझेंटेशन घेतलंय, लवकरच राज्यात नवीन गृहनिर्माण संस्थांना महसूलच्या जागा देण्याची पॉलिसी मंत्रिमंडळासमोर आणतो आहे. या पॉलिसीमुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेला स्वस्त घरे मिळतील, असा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राजस्थानमधील निवडणुकांच्या जबाबदारीबाबत बावनकुळे बोलले. ते म्हणाले, दहा महानगरपालिकांची जबाबदारी माझ्यावर आहे, दहाव्या महानगरपालिकेत आम्ही प्रवास करणार आहोत. टीम तयार केली आहे, राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील 30-40 कार्यकर्ते प्रवासाला जाणार आहेत. आमचे मुख्यमंत्री शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष राठोड यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आणू. असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. ते गुरुवारी नागपूरमध्ये बोलत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.