🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचा घरभाडे भत्ता फरक मिळणार; ३५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचा घरभाडे भत्ता फरक मिळणार; ३५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ


जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्ता फरक थकबाकी अखेर शिक्षक शिक्षकेतरांना मिळणार असून मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या ३ वर्षांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाला असल्याचे शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष संपत गीते यांनी सांगितले.

याबाबत अनिल बोरनारे यांनी मागील तीन वर्षांपासून शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबत राज्याचे शिक्षण संचालकांनी शालार्थ टॅब उपलब्ध करून देण्याबाबत शालार्थ सिस्टीम महा आयटी, मुंबई यांना निर्देश दिले आहेत. जुलै २०२१ पासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे घरभाडे भत्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २४ टक्केवरून २७ टक्केपर्यंत करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ पासून प्रत्यक्ष २७टक्केप्रमाणे वाढ देण्यात आली आहे, मात्र जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली.
निर्णय घेऊन थकबाकी अदा करावी !

राज्यातील शिक्षकांना शालार्थमध्ये टॅब उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आली नाही. हा शिक्षकांवर अन्याय असून याबाबत तातडीने निर्णय घेऊन थकबाकी अदा करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असे अनिल बोरनारे यांनी निवेदनाद्वारे शिक्षण संचालकांना कळवले होते. 

संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक
याबाबत तत्कालीन शिक्षण संचालकांनी ९ मार्च २०२३ च्या आदेशान्वये राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालकांना याबाबत प्रत्येक विभागात किती शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीचा घरभाडे भत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे. याचा आढावा घेऊन थकीत देयकांना संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घ्यावी व लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी ११ माही अंदाजपत्रकात करण्यात यावी या थकीत देयकांचा कालावधी हा १ वर्षावरील असल्याने शासन निर्णय दि. १५ जुलै २०१७ अन्वये सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे, असे सांगून माहिती प्राप्त झाल्यानंतर शालार्थमध्ये टीए एरिअर्स टॅब उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र अनिल बोरनारे यांना दिले होते. दरम्यान, आता आदेश निघाल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात या तीन महिन्याच्या घर भाडे भत्ता फरकाची रक्कम जमा होणार असल्याचे शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष संपत गीते, सुभाष अंभोरे यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.