🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवलेला शिक्षकच नराधम निघाला, अल्पवयीन मुलीला जीममध्ये बोलावून घाणेरडं कृत्य, मुंबई हादरली

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवलेला शिक्षकच नराधम निघाला, अल्पवयीन मुलीला जीममध्ये बोलावून घाणेरडं कृत्य, मुंबई हादरली


मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जीम ट्रेनरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती.

या तक्रारीवरून ट्रेनरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नराधम आरोपीला राष्ट्रपतींच्या हस्ते 2023 चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे इतक्या प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हातून ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विलेपार्लेतील पार्लेश्वर जिमनॅस्टिक व्यायाम शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

त्याचं झालं असं की पार्लेश्वर जिमनॅस्टिक व्यायाम शाळेचे शिक्षक गणेश देवरुखकर यांनी पीडित मुलीला व्यायाम शाळेत एकटीला बोलावले होते. त्यानंतकर गणेश देवरुखकर याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली होती.त्यानंतर कुटुंबियांनी मुलीसह विलेपार्ले पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून 48 वर्षीय नराधम शिक्षक गणेश देवरुखकरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

धक्कादायक म्हणजे बाब म्हणजे गणेश देवरुखकर या शिक्षकाला राष्ट्रपतींच्या हस्ते 2023चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यासह त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे इतक्या प्रतिष्ठीत व्यक्तीकडून अशी घटना घडल्याने संताप व्यक्त होतोय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.