🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह


पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपसभापती आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली. रामपुरहाटमध्ये आशीष यांच्या घराजवळच पक्षाचं कार्यलय आहे.

तिथं रविवारी सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी सुसाइड नोटही आढळली आहे. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली असून त्याची पडताळणी केली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते निलंजन दास यांनी आशीष बॅनर्जी यांची सुसाइड नोट शेअर केलीय. त्यात म्हटलंय की, भ्रष्टाचाराशी माझं देणं घेणं नाही, तरीही मला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. निलंजन दास यांनी सुसाइड नोट शेअर करताना आशीष बॅनर्जी यांची आत्महत्या धक्कादायक असल्याचं म्हटलंय.
सुसाइड नोटमध्ये काय?

मी विद्यार्थीदशेत असल्यापासून राजकारणाशी जोडला गेलो होतो. पण कधी कसलाच भ्रष्टाचार केला नाही. बर्दवान विद्यापीठ विद्यार्थी संघाचा महासचिव होतो तेव्हाही भ्रष्टाचार केला नाही. राजकारणात व्यस्त असताना कोणतंही पद मिळावं अशी इच्छा नव्हती. पक्षाकडून अनेकदा विनंती केली गेली, मी नकार देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकवेळी नकार देणं शक्य नव्हतं माझ्या आयुष्यात कशाच्या तरी बदल्यात कुणाकडून एक पैसा घेतला नाही. इतकंच काय माझ्यासोबतची मुलं अटेंडेंट म्हणून काम करायची तेव्हाही मी त्यांच्याकडून कोणत्याही पाहुण्यांचा खर्च घेतला नाही. आर्थिक भ्रष्टाचारात कधीच कसला संबंध नाही.
टीडीआरएमध्ये जनरल मिटिंग असायची आणि त्याचं रजिस्टर असायचं. मी टेंडर कमिटीत नव्हतो. माझ्याकडे चेक देण्याचे अधिकारही नव्हते. मी कोणता आराखडा मंजूर केला नाही ना कोणतं ना हरकत प्रमाणपत्र दिलं. या प्रकरणी माझ्यासमोर चर्चा व्हायची पण या कामाची मला माहिती नव्हती आणि त्यात हातही नव्हता असंही सुसाइड नोटमध्ये बॅनर्जी यांनी लिहिलंय.
मला बदनाम करण्यासाठी कोण षडयंत्र रचतंय माहिती नाही. येत्या दिवसात राजकारण एक युद्धाचं मैदान असेल. मी कॉलेजच्या मुलांना सांगेन की राजकारणात पडू नका. आपआपल्या कामात रहा, शांतता आणि शिस्त राखा. चांगले माणूस बना. मी आयुष्यभर शिकवलं. कधी वर्ग सोडला नाही. अनेक विद्यार्थ्यांना पैसे न घेता शिकवलं. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून प्रेमच मिळालं. आता निरोप घेण्याची वेळ आलीय. विनाकारण संशय आणि आरोपांनी त्रासलो आहे. खूप विचारपूर्वक निर्णय घेत आहे. माझ्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही असंही आशीष बॅनर्जी यांनी म्हटलंय.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.