🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत मोठा गोंधळ, CJP च्या अभिजित दिपकेंने विद्यार्थ्यांसोबत ठिय्या, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत मोठा गोंधळ, CJP च्या अभिजित दिपकेंने विद्यार्थ्यांसोबत ठिय्या, नेमकं काय घडलं?


छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीची नियोजित परीक्षा होणार होती. पण ही परीक्षा सुरु होण्याच्या 10 मिनिटाच्या आतच आटोपती घेण्यात आली.कारण सिस्टम लॉगआऊट झाले होते त्यामुळे सर्व विद्यार्थांना नापास करण्यात आलं होतं. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या स्थळी आंदोनल करायला सूरूवात केली होती. या घटनेची माहिती मिळताच क्रॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन ठिय्या मांडला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी परीक्षा पार पडली. ही परीक्षा कॉम्प्युटर जनरेट होती आणि या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. जसं कुणाचा किबोर्ड खराब होता, कुणाची कॉम्प्युटरची स्क्रिन छोटी होती, टायपिंग सॉफ्टेवेअर चालत नव्हतं, केंद्रावर सर्व्हर ठप्प, काही विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटर बंद पडल्याच्या तक्रारी होत्या.विशेष म्हणजे यात परीक्षा सुरु झाल्याच्या 10 मिनिटाच्या आत सिस्टम लॉगआऊट झाले आणि त्यांना नापास करण्यात आले. त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट आंदोलनाला सुरुवात केली होती. गेल्या 6 महिन्यापासून विद्यार्थी या परिक्षेची तयारी सूरू करत होते आणि प्रशासनाच्या गोंधळामुळे त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
या घटनेची माहिती मिळताच क्रॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या सगळ्या तक्रारी अभिजीत दिपके यांना सांगितल्या. त्यानंतर विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते आणि त्यांची पुर्नपरिक्षेची मागणी होती.या मागणीसाठी अभिजित दिपके यांनी देखील विद्यार्थ्यांसोबत ठिय्या मांडला आहे.जिल्हा कोर्टाचे जज जिथपर्यंत बाहेर येऊन लिखित स्वरूपात देत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच बसून आंदोलन करणार अशी भूमिका अभिजीत दिपके आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. 
आज इथे हायकोर्टाची परीक्षा होती. इथे खुप दुरुन दुरुन मुलं आली होती.बीड, अंबोजागाई, अमरावती या ठिकाणाहून विद्यार्थी आले होते. आणि जेव्हा हे विद्यार्थी परिक्षेला बसले तेव्हा त्यांना कळालं इथले जे कॉम्प्युटर आहेत ते नीट काम करत नाहियेत. कुणाचं कम्प्युटर चालत नाही आहे, तर कुणाच किबोर्ड काम करत नाहीये, आणि 10 मिनिटाच्या आत सगळे विद्यार्थी लॉगआऊट झाले,याचा अर्थ सर्वरही चांगल काम करत नव्हतं असा आरोप अभिजीत दीपकेने केला आहे. तसेच या सगळ्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलं, त्यामुळे हे विद्यार्थी फेल झाले नाही तर सिस्टम फेल झालं आहे,अशी टीका अभिजीत दिपके यांनी केली.
या विद्यार्थांना सांगतात तुम्हाला काय अकला नाही का, परीक्षा कशा द्यायच्या त्या. पण यांना अकला नव्हत्या, यांना माहिती होत ऑनलाईन परीक्षा आहेत, मगं यांना अकला नव्हत्या का चांगला किबोर्ड, कम्प्युटर लावावा, अशा शब्दात दिपकेने हल्लाबोल केला. तसेच अभिजीत दिपकेने विद्यार्थ्यांसोबत ठिय्या मांडला आहे. जिथपर्यंत जिल्हा कोर्टाटे जज बाहेर येऊन पुर्नपरिक्षेची हमी लिखित स्वरूपात देत नाही तिथपर्यंत अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.