🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'नशीब फळफळलं पण वेळ हुकली!' सकाळी ९ वाजता घटस्फोट, दुपारी १२ वाजता नवऱ्याला २ कोटींची लॉटरी!

'नशीब फळफळलं पण वेळ हुकली!' सकाळी ९ वाजता घटस्फोट, दुपारी १२ वाजता नवऱ्याला २ कोटींची लॉटरी!

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओ तुफान व्हायरल होतात आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगते. आता देखील असंच काही झालं आहे. सकाळी 9 वाजता पती पत्नीचा घटस्फोट होतो.

त्यानंतर दुपारी 12 वाजता पती 2 कोटी रुपयांची लॉटरी जिंकतो. त्यानंतर पत्नी लॉटरीच्या पैशांवर स्वतःचा हक्क सांगते. ज्यावर कोर्टात पुन्हा सुनावणी होते…. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

सकाळी 9 वाजता घटस्फोट झाल्यानंतर पूर्व पतीला 2 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर महिला दावा करते की, घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पतीने जॉइंट अकाऊंटमधून हे लॉटरीचे तिकीट घेतलं होतं. एवढंच नाही तर, महिला म्हणते, 'मी माझ्या आयुष्यातील 7 वर्ष वाया घालावली. त्यासाठी मी माझ्या करियरचा त्याग केला, त्याला पाठिंबा दिला. 2, 7, 14, 28 आणि 39 हे अंक त्यांच्या लग्नाची तारीख, प्रपोजलची तारीख, लग्नाचा वाढदिवस यांसारख्या आठवणींशी जोडलेले आहेत, त्यामुळे लॉटरीत लागलेल्या पैशांमध्ये माझा देखील वाटा आहे… असं महिला म्हणते.


यावर महिलेचा पूर्व पती म्हणतो, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांचा घटस्फोट अधिकृतपणे मंजूर झाला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता वकिलाच्या ऑफिसमधून निघाल्यावर त्याने बिअर आणि लॉटरी तिकीट खरेदी केलं. तो सांगतो की त्याने अंकांची निवड स्वतः केली नव्हती, तर कॉम्प्युटरने ते अंक निवडले होते. त्यामुळे हा पैसा घटस्फोटानंतरचा असून त्यावर पत्नीचा कोणताही हक्क नाही. अस व्हिडीओत दिसणारा पुरुष म्हणत आहे. पण निकाल काय लागला हे समोर आलेलं नाही.

सांगायचं झालं तर व्हिडीओ परदेशातील आहे. पण सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओ कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.