🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'साहेब, बायकोनं शिळा भात दिला!' : तुकाराम मुंढेंकडे पोहोचली अजब तक्रार; २ महिन्यांत प्रकरणच केलं सरळ!

​'साहेब, बायकोनं शिळा भात दिला!' : तुकाराम मुंढेंकडे पोहोचली अजब तक्रार; २ महिन्यांत प्रकरणच केलं सरळ!

महाराष्ट्राचे डॅशिंग अधिकारी अन् तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले तुकाराम मुंढे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आपल्या बेधडक कारवाईने तुकाराम मुंढे एफडीएला सुतासारखं सरळ करत आहेत.

अशातच आता मुंढेंनी सुरू केलेल्या एफडीएच्या ऑनलाईन तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऑनलाईन प्रणालीनंतर अशा काही तक्रारी दाखल झाल्या, ज्यामुळे अधिकाऱ्यांचं टेन्शन वाढलंय.

दोन महिन्यात तब्बल 7005 तक्रारी

बायकोनं रात्रीचा शिळा भात सकाळी नाष्ट्याला दिलाय इथंपासून ते घराच्या बाजूला दारूचं दुकान आहे, अशा घरगुती अन् अजब गजब तक्रारी दाखल झाल्याचं पहायला मिळतंय. एफडीएच्या पोर्टलवर तक्रारींचा पाऊस पडत असून गेल्या दोन महिन्यात तब्बल 7005 तक्रारी दाखल झाल्या आहेत. आता घरबसल्या तक्रार दाखल करण्याची सुविधा दाखल करण्यात आल्यानंतर आता 2809 तक्रारींची चौकशी होऊन निकाली लागल्या आहेत.

अत्याधुनिक ऑनलाइन पोर्टल

अन्न आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रशासनाने आता तक्रार नोंदवण्यासाठी एक अत्याधुनिक ऑनलाइन पोर्टल (complaints.mahafda.in) सुरू केले आहे. अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी करता येतील. ग्राहकांना आपली तक्रार सबमिट केल्यानंतर तिची सद्यस्थिती (Track Status) पाहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई


एफडीएने पुण्यात नुकतीच मोठी कारवाई केली. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरी अँड फॉरवर्डिंग (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द केला आहे. नियामक संस्थेच्या मते, ही कारवाई रिएक्टिन प्लस टॅब्लेट्सच्या स्टोरेज, पॅकेजिंग आणि बाजारातून औषध परत मागवण्याच्या प्रक्रियेत आढळलेल्या गंभीर अनियमिततेमुळे करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे जिल्ह्यातील वाडकी येथील कंपनीच्या मुख्य वेअरहाऊसमध्ये करण्यात आलेल्या तपासणीनंतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.