कोल्हापूर : जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यानेच बोगस डॉक्टरांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. तक्रार आली, तरच आरोग्य विभाग तपासणीसाठी पुढे येतो. गाव, तालुका पातळीवरच आरोग्य समित्यांनी बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे; पण समित्या कुचकामी ठरल्या आहेत.
जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर विरुद्ध समिती कारवाई करते, तालुक्यातील समितीला ते का होत नाही, असा सवाल आहे. बोगस डॉक्टरांच्या उपचारांमुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा पैसा मिळवण्याचा खुलेआम धंदा त्यांनी सुरू केला आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेने छापे टाकून अशा डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
कंपाऊंडर झाले डॉक्टर
जिल्ह्यात अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांनी हाताखाली औषधे, वैद्यकीय साहित्य काढून देण्यासाठी कंपाऊंडर ठेवलेले असतात. रुग्णांना औषधे, गोळ्या देण्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते. त्यातून अनेक कंपाऊंडरना निवडक औषधांची काही अंशी ओळख होऊन जाते. त्यातून संबंधित डॉक्टरांच्या परवान्यावर इतर ठिकाणी दवाखाना उघडतात. ज्या डॉक्टरच्या परवान्याशी तो संलग्न असेल त्या डॉक्टरला त्याच्याकडून महिन्याकाठी 'कट' ठरलेला असतो.
येथे करता येते तक्रार
जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर तपास समिती : जिल्हाधिकारी (अध्यक्ष), जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारीतालुकास्तरीय समिती : गटविकास अधिकारी (अध्यक्ष), विस्तार अधिकारी (सदस्य), तालुका अधिकारी (सदस्य सचिव)जिल्हा पुनर्विलोकन समिती : गुन्हा दाखल करणे, समितींना मार्गदर्शन करणे, कारवाईस मान्यतामहापालिकास्तरीय समिती : आयुक्त (अध्यक्ष), आरोग्य अधिकारी (सदस्य सचिव)नगरपालिकास्तरीय समिती : मुख्य कार्यकारी अधिकारी (अध्यक्ष), आरोग्य अधिकारी (सदस्य सचिव)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.