पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ झाली आहे. भगवंत मान यांच्या पत्नीला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर ५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. एनएच आरसीने या प्रकरणी १५ दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला नोटीस आल्यामुळे या घटनेची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रणजित सिंग यांनी आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी असे सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीने ५ लाख रुपयांच्या लाचेच्या बदल्यामध्ये बलात्काराचे प्रकरण दाबण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या महिला सुरक्षा विभागाला याची माहिती दिली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्या प्रियांक कानूंगो यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा महिला आणि मुलांच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील प्रकरणात राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीवर असे आरोप केले जातात. तेव्हा ही अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे. आम्ही पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच आयोग पुढील कारवाई करेल.'प्रियांक कानूंगो अधिकाऱ्यांना इशारा म्हणाल्या की, 'अधिकाऱ्यांनी संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर केवळ जनतेच्या कल्याणासाठीच करावा. जर ते कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाखाली काम करत असतली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. आम्ही त्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.' राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने स्पष्ट केले की, पंजाब पोलिस आणि प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच निष्पक्ष चौकशी प्रक्रिया पुढे नेली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.