सांगलीत सामाजिक ऐक्याचे दर्शन! स्वातंत्र्यदिनी बिरनाळे चौकात रंगला जिलबी वाटपाचा गोडवा.
सांगली :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज, १५ ऑगस्ट रोजी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर अप्पासाहेब बिरनाळे चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात आणि आनंदात जिलेबी वाटपाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
हा सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश बरडोले, आमिर गवंडी, सागर जाधव, अमोल पाटील, अमोल धोतरे, रणजित वडर, स्वप्निल शिंदे आणि रेहान शेख यांच्या प्रमुख पुढाकाराने व उपस्थितीत अत्यंत यशस्वीरीत्या पडला.
परंपरा आणि नागरिकांचा हातभार:
अप्पासाहेब बिरनाळे चौक येथे स्वातंत्र्यदिनी जिलेबी वाटप करण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील नागरिक केवळ जिलेबीचा आस्वाद घेण्यासाठीच येत नाहीत, तर या उपक्रमात स्वतःहून सहभागी होऊन आपला मोलाचा हातभारही लावतात. त्यामुळे या उपक्रमाला एका मोठ्या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
विद्यार्थ्यांचा लक्षवेधी सहभाग:
या कार्यक्रमात परिसरातील अप्पासाहेब बिरनाळे कॉलेजमधील तरुण-तरुणींनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. तरुणांच्या या उत्साही सहभागामुळे उपक्रमात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली.स्वातंत्र्य दिनाचा आनंद एकमेकांना गोडधोड भरवून साजरा करणे आणि समाजात बंधुभाव टिकवून ठेवणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दिवसभरात शेकडो नागरिक, पादचारी व वाहनधारकांनी या जिलेबी वाटपाचा लाभ घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.