आयोध्या: मथळा वाचून दचकलात ना? तुम्हाला ही प्रश्नावली म्हणजे कोणत्या तरी विवाहेत्सुकाकडे त्याच्याशी बोलताना केलेली चौकशी वाटली असेलच; पण तसे नाही. तर हे आहेत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी मुलाखत देणार्यांना समितीने विचारलेले प्रश्न.
श्रीराम मंदिराच्या सीईओ पदासाठी नियुक्तीसाठी सोमवारपासून मुलाखतींना सुरुवात झाली आहे. या पदासाठी देशभरातून ५ हजार २०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५ फेऱ्यांतील ऑनलाईन संवाद व छाननीनंतर १८ उमेदवारांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या मुलाखतींत उमेदवारांच्या प्रशासकीय कौशल्यासोबतच सनातन धर्मावरील त्यांच्या श्रद्धेशी संबंधित बारकाईने प्रश्न विचारले जात आहेत. सीईओ पदासाठी निवडला जाणारा उमेदवार हा सनातन धर्माचा कट्टर पाठीराखा आणि पूर्णपणे व्यसनमुक्त असावा, अशी ट्रस्टची भूमिका आहे. श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक करण्यासाठी ५० ते ७० वयोगटातील अनुभवी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे मुलाखतीत गर्दीचे व्यवस्थापन आणि नेतृत्वगुण प्रामुख्याने तपासले जात आहेत.
समितीने उमेदवारांकडून घेतलेली माहिती
* सीईओ पदाचा अनुभव किती?* हिंदू धर्माशी नाते कसे आहे?* सनातन धर्मावरील श्रद्धा?* जानवे घालता का?* मद्यपान करता का?* शाकाहारी आहात की मांसाहारी?* सीईओ पदासाठी प्रशासकीय अनुभव किती आहे?* गर्दीचे व्यवस्थापन ते संघ व्यवस्थापन याबाबत मते* उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची पूजा पद्धती कशी आहे?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.