🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

UPI, NEFT किंवा IMPS द्वारे व्यवहार करताय? 'या' चुका केल्यास थेट येईल प्राप्तिकर विभागाची नोटीस

UPI, NEFT किंवा IMPS द्वारे व्यवहार करताय? 'या' चुका केल्यास थेट येईल प्राप्तिकर विभागाची नोटीस


आजच्या डिजिटल युगात यूपीआय (UPI), एनईएफटी (NEFT) किंवा आयएमपीएस (IMPS) द्वारे पैसे ट्रान्सफर करणे अत्यंत सोपे झाले आहे. तुम्ही आर्थिक व्यवहारासाठी या साधनांचा वापर करत असाल तर काही नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत. 
प्राप्तिकर विभागाची देशातील नागरिकांच्या प्रत्येक डिजिटल व्यवहारांवर बारीक नजर आहे. अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या नोटीसीला सामोरे जावे लागू शकते. कोणत्या परिस्थितीत आपल्याला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते, हे कर तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
तुमच्या डिजिटल व्यवहारांची कधी तपासणी होऊ शकते?

सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे प्राप्तिकर परतावा भरताना विवरणपत्रात कोणतीही आर्थिक माहिती लपवू नये. करदात्याचे घोषित उत्पन्न आणि आर्थिक व्यवहार यांमध्ये विसंगत आढळल्यास नोटीस येण्याची १००% खात्री आहे. तुमचे घोषित उत्पन्नातील तफावत शोधण्यासाठी प्राप्तिकर विभाग विविध स्रोतांद्वारे माहिती गोळा करत असते. यामध्ये तुमच्या यूपीआयपासून आयएमपीएसपर्यंत सर्व माध्यमांचा समावेश आहे. जेव्हा तुमच्या खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार होतात. पण, आयटीआरमध्ये ती दर्शवली जात नाही, अशा परिस्थितीत सहसा तपासणीची शक्यता निर्माण होते. विशेषकरुन टीडीएस (TDS) कापला गेला आहे आणि ‘फॉर्म २६एएस’ किंवा ‘वार्षिक माहिती विवरणपत्रात’ त्याची नोंद आहे. पण, संबंधित उत्पन्न कर विवरणपत्रात दिसत नाही, अशा व्यवहारांकडे कर तज्ज्ञ लक्ष द्यायला सांगतात.

प्राप्तिकर विभाग तुमचे आर्थिक व्यवहार कसे तपासते?
प्राप्तिकर विभागाला बँका, वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड, मालमत्तेशी संबंधित प्राधिकरणे आणि इतर विशिष्ट संस्थांकडून ‘आर्थिक व्यवहारांचे विवरणपत्र’ (SFT) या प्रणालीअंतर्गत माहिती मिळत असते. ही माहिती तुमच्या पॅन आणि इतर ओळख क्रमांकाशी जुळवून पाहिली जाते. त्यानंतर विभाग AIS आणि फॉर्म 26AS मधील माहितीची तुलना ITR मध्ये घोषित केलेल्या उत्पन्नाशी करते.
करदाते अनावश्यक नोटिसा कशा टाळू शकतात?

करदात्यांनी आपला आयटीआर दाखल करण्यापूर्वी नियमितपणे आपला एआयएस (AIS) आणि फॉर्म २६एएस (Form 26AS) तपासणे आवश्यक आहे. एआयएसमध्ये जर चुकीची माहिती दिसली तर ती दुरुस्त करुन घ्यावी. विशेषतः मोठ्या गुंतवणुकी आणि देयकांसाठी बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीच्या नोंदी आणि सहाय्यक कागदपत्रांची मदत घ्या.

वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहार वेगळे ठेवावे
बहुतेक करदाते ही सामान्य चूक करतात. अनेकांचे वैयक्तिक व्यवहार आणि व्यावसायिक व्यवहार एकाच बँक खात्यातून होत असतात. परिणामी आयटीआर भरताना गोंधळ होण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.