🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: किरण श्रीकांत भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन; वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास​

सांगली: किरण श्रीकांत भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन; वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
येथील कै. दत्तात्रय शंभू भोसले यांचे नातू आणि श्रीकांत दत्तात्रय भोसले यांचे मोठे सुपुत्र किरण श्रीकांत भोसले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ४९ वर्षे होते. त्यांच्या या अकाली जाण्याने भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सांगली शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.

​किरण भोसले हे अत्यंत मनमिळवू, नम्र आणि आपुलकीच्या स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. सामाजिक तसेच मित्रपरिवारात त्यांचा मोठा स्नेहबंध होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सांगलीतील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी, आप्तेष्टांनी आणि मित्रपरिवाराने भोसले कुटुंबीयांचे सांत्वन केले.
​त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण भोसले परिवाराची आणि मित्रपरिवाराची भरून न निघणारी हानी झाली आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दि. 10 रोजी सकाळी 9 वाजता आहे.

सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🏻

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.