🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राला काळिमा! ५३ चिमुकल्यांवर अत्याचार, ६४९ व्हिडिओ अन् हजारो फोटो; नंदुरबारच्या विकृत नराधमाचे हैराण करणारे कृत्य!

महाराष्ट्राला काळिमा! ५३ चिमुकल्यांवर अत्याचार, ६४९ व्हिडिओ अन् हजारो फोटो; नंदुरबारच्या विकृत नराधमाचे हैराण करणारे कृत्य!

नंदुरबार : नंदुरबारमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. नंदुरबार शहरात अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप असून, पोलिसांनी स्वतःहून सुमोटो गुन्हा दाखल करत केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.


तब्बल 53 बालकांवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडून 649 पेक्षा अधिक व्हिडिओ क्लिप्स आणि 1000 हून अधिक फोटो पोलिसांनी जप्त केले आहेत.

नंदुरबार शहरात समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या चार वर्षांपासून अल्पवयीन बालकांवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या संशयित आरोपीला नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात कोणतीही तक्रार समोर न आल्याने पोलिसांनी स्वतःहून सुमोटो गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपीकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

दरम्यान, आरोपीकडून आणखी काही व्हिडिओ आणि फोटो मिळण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे. पोलिस कस्टडीत असलेल्या आरोपीची सखोल चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी काही पीडित समोर येतात का, याचा तपास केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका व्यक्तीच्या या कथित कृत्यामागे असलेली मानसिक विकृती आणि त्याचे सामाजिक परिणाम याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. एकीकडे पोलिसांकडून या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे, तर दुसरीकडे या पुराव्यांच्या आधारे आणखी किती पीडितांची ओळख समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नंदुरबारातील या धक्कादायक प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे आणखी गंभीर खुलासे होण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.