महावितरणने वीज ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केले आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना प्रति युनिट दहा ते साठ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत.
ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला वाढीव वीज बिल येणार आहे. उन्हाळ्यातील विक्रमी वीज मागणी आणि महागड्या दराने केलेल्या वीज खरेदीच्या भरपाईसाठी हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशी असेल प्रति युनिट दरवाढ
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक - १० पैसै१०० युनिटपर्यंत - १२ पैसे१०१ ते ३०० युनिट - ४० पैसे३०१ ते ५०० युनिट - ५५ पैसे५०० युनिटपेक्षा अधिक - ६० पैसे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.