🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आश्रमातच 'असुरक्षित' लेकी! २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, नराधमाकडून दहावीच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; प्रशासनाविरोधात तीव्र संताप

आश्रमातच 'असुरक्षित' लेकी! २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, नराधमाकडून दहावीच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; प्रशासनाविरोधात तीव्र संताप


गडचिरोली आणि पालघर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका आश्रमशाळेमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शहापूर तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील एका कर्मचाऱ्यानं शाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शहापूर आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेत हा प्रकार घडलाय. सदर कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. यानंतर जिजाऊ सामाजिक संस्थेच्या रंजना उघडे यांनी भेट दिल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केलाय. विद्यार्थिनींनी आपली कैफियत मांडत आरोपी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही संताप व्यक्त करत आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहापूर तालुक्यातील टेंभा आश्रम शाळेची एकच इमारत असून दुसऱ्या मजल्यावर मुले व तिसऱ्या मजल्यावर मुलींचा वस्तीगृह आहे. विद्यार्थिनी मुली कपडे धुण्यासाठी तसेच जेवण करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून खाली ये जा करत असतात. विद्यार्थिनी तिसऱ्या मजल्यावरून खाली येत किंवा खालच्या मजल्यावरून वरती जात असत त्यावेळी आरोपी कर्मचारी हा विद्यार्थिनींना सारखा त्रास देत असायचा. 

आरोपीने इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला एकटं गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनीने घडलेली हकीकत अधिक्षकांना सांगीतली यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात BSN सेक्शन अंतर्गत कलम 354 तसेच पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कर्मचाऱ्याने 21 विद्यार्थ्यीनीना त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.