🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीसांची 'पंतप्रधान' पदासाठी तयारी? समय रैनासोबतच्या व्हिडिओमागील गुप्त स्ट्रॅटेजी उघड!

देवेंद्र फडणवीसांची 'पंतप्रधान' पदासाठी तयारी? समय रैनासोबतच्या व्हिडिओमागील गुप्त स्ट्रॅटेजी उघड!


देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार आहेत, अशी कोणतीही घोषणा भाजपने केलेली नाही. फडणवीसांनी स्वतःही दिल्लीला जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, उलट महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु राजकारणात नेते काय म्हणतात यापेक्षा त्यांच्या हालचाली, त्यांच्याभोवती तयार केलेले राजकीय नैरेटिव्ह  आणि पक्षाच्या सत्ताकेंद्रात त्यांचे वाढते महत्त्व अधिक काही सांगून जाते. 

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार आहेत, अशी कोणतीही घोषणा भाजपने केलेली नाही. फडणवीसांनी स्वतःही दिल्लीला जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, उलट महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु राजकारणात नेते काय म्हणतात यापेक्षा त्यांच्या हालचाली, त्यांच्याभोवती तयार केलेले राजकीय नैरेटिव्ह आणि पक्षाच्या सत्ताकेंद्रात त्यांचे वाढते महत्त्व अधिक काही सांगून जाते.

आजचे चित्र पाहता एक प्रश्न विचारला जाऊ शकतो-देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रीय नेतृत्वाचा प्लॅन सुरू झाला आहे का? या प्रश्नाला अचानक काही आधार मिळालेला नाही. भाजपच्या Parliamentary Board च्या संभाव्य फेररचनेत फडणवीसांचे नाव चर्चेत आहे. या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळात काही विद्यमान मुख्यमंत्री आणि तरुण नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये फडणवीस, योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिस्वा सरमा यांची नावे चर्चेत आहेत, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण फडणवीसांनी केंद्रात संधी मिळाली तर पंतप्रधानपदासाठी सर्व तयारी सुरू केली आहे. 

२६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सायबरने 'Digital Arrest' ही सायबर जनजागृती शॉर्ट फिल्म आणि १९३० Cyber Anthem लाँच केले. या कार्यक्रमात पंकज त्रिपाठी, आशिष विद्यार्थी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, सुनिधी चौहान यांच्यासोबत समय रैना देखील उपस्थित होता आणि फडणवीसांनी त्याचा सत्कार केला. पण खरा ट्विस्ट इथेच आहे-या सर्व कलाकारांमध्ये समय रैनाचा समावेश. समय रैना हा केवळ कॉमेडियन नसून YouTube, स्टँड-अप कॉमेडी आणि डिजिटल कल्चरमधून उदयास आलेला एक राष्ट्रीय तरुण चेहरा आहे.

'India's Got Latent' च्या वादामुळे त्याचे नाव देशभर चर्चेत आले. त्याच्यावर महाराष्ट्र सायबरशी संबंधित कारवाईची पार्श्वभूमी असतानाही, तो आज त्याच महाराष्ट्र सायबरच्या जनजागृती मोहिमेचा चेहरा बनून मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंचावर उभा राहतो. समय रैना हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशभरातील Gen-Z मध्ये लोकप्रिय असलेला डिजिटल चेहरा आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे हे भाजपसमोरचे मोठे आव्हान आहे, कारण पारंपारिक राजकीय भाषेपेक्षा Gen-Z सोशल मीडिया आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर्सशी अधिक जोडलेली आहे. त्यामुळे समय रैनासारख्या राष्ट्रीय लोकप्रियतेच्या चेहऱ्याला सोबत घेऊन फडणवीस महाराष्ट्राबाहेरील तरुणांपर्यंतही आपली पोहोच वाढवत आहेत. याआधीही Gen-Z आउटरीचचा (outreach) असाच पॅटर्न दिसला आहे. २३ ऑगस्टला नागपुरातील 'Manthan 4 Yuva' कार्यक्रमात फडणवीसांनी थेट Gen-Z शी संवाद साधला आणि आपल्या राजकीय प्रवासापासून ते युवक, स्टार्टअप आणि नेतृत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. इतकेच नाही, तर भाजपने महाराष्ट्रात Har Ghar Tiranga सारख्या मोहिमांमध्ये Gen-Z आणि Gen-Alpha ला विशेष लक्ष्य केले आहे. नशामुक्तीच्या 'Campus Connect' अभियानाद्वारेही फडणवीस थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजेच समीकरण स्पष्ट आहे-युवा, सोशल मीडिया, राष्ट्रवाद आणि विकास यावर फडणवीसांनी लक्ष केंद्रित केले आहे. दुसरा मुद्दा म्हणजे भाषेचा. मुंबईतील मराठी भाषा वादात फडणवीसांनी हिंदी भाषिक ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीत तज्ज्ञ होण्याची गरज नसल्याचे सांगितले.
कामापुरती मराठी माहिती असणे पुरेसे असल्याचे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, कोणावरही भाषेच्या आधारावर अन्याय होऊ देणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात हा संदेश आहे; पण राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा अर्थ अधिक व्यापक होतो. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या नागरिकांना दूर लोटणारा नेता आणि त्यांना सोबत घेणारा नेता-या दोन प्रतिमांमध्ये दिल्लीच्या राजकारणात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण उत्तर प्रदेशकडे ८० लोकसभा जागा आहेत आणि नरेंद्र मोदी व राहुल गांधी दोघांचेही राष्ट्रीय राजकारण उत्तर प्रदेशशी जोडलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विस्तार करू पाहणाऱ्या कोणत्याही नेत्याला हिंदी पट्ट्यात स्वीकारार्हता निर्माण करावीच लागते. फडणवीस नेमके तेच करत आहेत; मराठी अस्मिता जपतानाच ते हिंदी भाषिकांना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांसाठीच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरही फडणवीसांचा PR ॲक्टिव्ह झाला आहे. फडणवीसांची हिंदी मीडिया रणनीती आता केवळ बातम्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यांच्या कार्यक्रमांना आणि निर्णयांना हिंदी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर कव्हरेज मिळत असून, काही ठिकाणी ३०-४० मिनिटांचे विशेष पॅकेजेसही दिले जात आहेत.
या कार्यक्रमांतून फडणवीसांना महाराष्ट्रातील विकासवादी, हिंदुत्ववादी आणि Gen-Z शी जोडणारा तरुण नेता म्हणून सादर केले जात आहे. यामुळे त्यांची प्रतिमा आता केवळ मराठी मतदारांपुरती न राहता राष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. हीच रणनीती पुढे फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणासाठी तयार करण्याच्या PR मोहिमेचा भाग असू शकते. अशा परिस्थितीत फडणवीसांचा भाजपच्या Parliamentary Board मध्ये संभाव्य प्रवेश हे त्यांच्या पदापेक्षाही राजकीयदृष्ट्या जास्त महत्त्वाचे आहे. RSS शी त्यांचे जुने आणि मजबूत संबंध पाहता, या फेररचनेत त्यांना स्थान मिळाले तर त्याला संघाच्या पाठबळाचा महत्त्वाचा संकेत मानले जाऊ शकते. कारण Parliamentary Board मध्ये प्रवेश म्हणजे फडणवीसांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमेबाहेर जाऊन भाजपच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पोहोचणे होय. पुढे मोदी-शाह नंतरच्या नेतृत्वाच्या चर्चेत फडणवीसांचे नाव घ्यायचे असेल, तर अशा राष्ट्रीय संस्थांमधील त्यांची उपस्थिती त्यांचे वजन नक्कीच वाढवेल. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास, फडणवीसांच्या राजकारणामागचा मोठा प्लॅन आता स्पष्ट होत आहे-त्यांना केवळ महाराष्ट्राचा नेता म्हणून नव्हे, तर भाजपचा पुढचा राष्ट्रीय आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून तयार केले जात आहे, असे चित्र दिसते. RSS शी असलेली मजबूत नाळ, हिंदी माध्यमांतून निर्माण होणारी राष्ट्रीय प्रतिमा, Gen-Z शी थेट संपर्क आणि Parliamentary Board मधील संभाव्य प्रवेश ही केवळ घटनांची मालिका नसून, त्या एका मोठ्या राजकीय तयारीचे टप्पे आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.