🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'श्रावणी सोमवार आहे मटण नाही बनणार', नॉन-व्हेज खाण्यासाठी घरात राडा; पुण्यात संतापलेल्या बापाने पोटच्या लेकराला संपवलं

'श्रावणी सोमवार आहे मटण नाही बनणार', नॉन-व्हेज खाण्यासाठी घरात राडा; पुण्यात संतापलेल्या बापाने पोटच्या लेकराला संपवलं


पुणे : पुण्यातील वारजे माळवाजी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रावण महिन्यात मुलाने मटण मागितल्याने संतापलेल्या बापाने चक्क लेकाची हत्या केली आहे. श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य असल्याचे वडिलांनी मुलाला समजावले मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या वरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला.

अखेर संतापलेल्या वडिलांनी मुलगा महेश गायकवाडची हत्या केली. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या आईनेच हत्येचे पुरावे नष्ट करण्यात बापाला मदत केली. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आईला तर मुलाची हत्या केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय 64) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय 60 ) या दोघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 24 ऑगस्ट रोजी वारजे माळवाडी भागातील रामनगर परिसरात रात्री 10.30 ते पहाटे 4 च्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी हे वारजे भागात पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आईवडिल आणि लहान भाऊ शेजारी वास्तव्यास आहेत. त्यांचा लहान भाऊ महेश याचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता मात्र कुठले काम धंदा करत नसल्याने आणि दारूचे व्यसन असल्या कारणाने त्याच्या पत्नी त्याला सोडलं होतं. त्याची पत्नी आणि दोन मुलं हे माहेरी राहायला गेले. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये घटस्फोट सुद्धा झाला.
श्रावणी सोमवारी नेमकं काय घडलं?

महेश एकटा राहत असून तो जेवणासाठी आईवडिलांकडे जात असे. काहीच कामधंदा करत नसल्याने आणि सतत दारू पिऊन येत असल्यामुळे वडिलांचे त्याच्यासोबत सतत भांडणे होत. दारु पिऊन घरी आल्यावर तो जेवणासाठी कायम मांसाहार मागायचा. सध्या श्रावण महिना सुरु असल्याने घरी मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात अनेकवेळा यापूर्वी सुद्धा वाद झाले 24 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजण्याचा सुमारास महेश नेहमीसारखं दारु पिऊन घरी आला. यावेळी त्याने मटण कालवण करून देण्याची मागणी घरी केली. मात्र श्रावण सुरू असल्याने घरात मांसाहार करत नसल्याचे सांगितल्यानंतर सुद्धा त्याने हट्ट धरला. या हट्टाचे रूपांतर वादावादी मध्ये झाले. यावेळी त्याच्या वडिलांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर जबर मारहाण केली.

आई - वडिलांना अटक
या मारहाणीत महेशचा दुर्दैवी अंत झाला. आपला मुलगा मारहाणीत दगावला गेल्याची माहिती असताना सुद्धा आई ने मात्र पती ला वाचवण्यासाठी ही बाब कोणाच्या ही लक्षात आणून दिली नाही आणि घटनास्थळावरून पुरावे सुद्धा नष्ट केले. या प्रकरणी आई वडिलांना अटक केली असून त्यांच्याकडे अधिक चौकशी वारजे पोलिसांकडून सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.