पुणे :- पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) परिसरात आयोजित ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या हजारो तरुण-तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी देशातील सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. "आम्हाला स्वतःची 'मन की बात' सांगणारा नेता नको, तर आमचे प्रश्न आणि समस्या ऐकून घेणारा हवा आहे," अशी रोखठोक प्रतिक्रिया या वेळी विद्यार्थ्यांनी दिली.
पुण्यात विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा लोंढा
पुणे शहर, उपनगर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावित्रीच्या लेकींसह हजारो विद्यार्थी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे शहरभरातील पीएमपीएमएल, एसटी बस आणि मेट्रो स्थानकांवर तरुणांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी अनेक पालकांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
महागाई, सुरक्षा आणि उच्च शिक्षणाचे प्रश्न
कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘झेन-झी’ (Gen-Z) पिढीचे गट उत्साहात दाखल होत होते. या वेळी तरुणींनी देशातील वाढती महागाई, महिलांची सुरक्षा आणि उच्च शिक्षणातील सोयी-सुविधांचा अभाव यांवर चिंता व्यक्त केली. पालकांनीदेखील "देशात स्थिर सरकार असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर विकास दिसत नसून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सामान्य नागरिक अडचणीत आहे," अशी खंत बोलून दाखवली.
विद्यार्थिनींनी मांडली थेट भूमिका:
नेत्यांच्या सभेचा पहिलाच अनुभव: "आम्ही यापूर्वी कधीही कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभेला गेलो नव्हतो. केवळ राहुल गांधींची भूमिका आणि विचार समजून घेण्यासाठी येथे आलो आहोत."सत्ता बदलाची गरज: "देशात सध्या केवळ पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भ्रष्टाचार वाढला असून सध्याचे अनेक नेते वृद्ध झाले आहेत. देशात सत्ता बदल करण्याची ताकद राहुल गांधींमध्येच आहे."तरुण नेतृत्वाला वाव: "राहुल गांधींची विचारसरणी नवीन आणि तरुण नेतृत्वाला संधी देणारी आहे."भाजपला सोडचिठ्ठी: "आम्ही यापूर्वी भाजपसाठी काम करत होतो, मात्र आता भाजप सोडून राहुल गांधींच्या विचारांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.