🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ही गोष्ट महाराष्ट्राची, मी मराठीतच बोलणार...', राहुल गांधींसमोर Gen Z वाघिण बेधडक बोलली

'ही गोष्ट महाराष्ट्राची, मी मराठीतच बोलणार...', राहुल गांधींसमोर Gen Z वाघिण बेधडक बोलली


लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज हा कार्यक्रम सुरु आहे.या कार्यक्रमात अनेक Gen Z तरुणींनी राहुल गांधींसमोर आपले प्रश्न मांडले आहेत. यावेळी महाराष्ट्राच्या एक वाघिणी राहुल गांधींसमोर बेधडक बोलली आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने 'ही गोष्ट महाराष्ट्राची, मी मराठीच बोलणार असा आग्रह धरत आपल्या समस्या मांडल्या.

मला सकाळपासून खुप ताप आहे, तरी देखील मी आली आहे.कारण पुण्याच्या मांजरीमध्ये मागच्या 10 दिवसांपासून उपोषण सूरू आहे. माझे भाऊ आणि बहिणी तिकडे आंदोलन करतायत. यावेळी तिने आपल्या मागण्यांचे निवेदनही राहुल गांधीकडे दिले.तसेच तिने आपल्या मागण्या राहुल गांधींसमोर मांडताना मी मराठीत बोलेन कारण ही गोष्ट फक्त आदिवासी विद्यार्थ्यांची नाही आहे, तर ती संपूर्ण देशाची आहे आणि विशेष करून महाराष्ट्राची आहे.त्यामुळे मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे.

''आम्ही उपोषणात बसले आहोत त्याच्याच आमचे भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यातल्या एका बहिणीची आज तब्येत खुपच नाजूक आहे, त्यामुळे तिला हॉस्पिटलला अॅडमीट केलं होतं.इतकी वाईट परिस्थिती असताना आमचे प्रतिनिधी मंत्रालयात गेले, तेव्हा जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते आम्हाला म्हणाले, सॉरी हे माझ्या हातात नाही, हे मुख्यमंत्र्‍यांच्या हातात आहे. 
मग तुम्ही जर आदिवासी विभागाच्या विकासासाठी खुर्चीवर बसला आहात, आणि तुम्ही जर आम्हा आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास साधू शकत नाही तर तुम्हाला खुर्चीवर बसायचा अधिकार नाही, हे मी ठणकावून सांगते'',असे आदिवासी विद्यार्थी म्हणाली. आमच्या आश्रम शाळांमध्ये सेंट्रल किचन पद्धत लागू आहे. एका ठिकाणी जेवण बनणार आणि 70 ते 80 किलोमीटर लांब घेऊन जाणार, त्यामुळे हे जेवण खराब होते.त्यामुळे विषबाधा होतात, अशा महत्वाच्या विषयावर देखील आदिवासी विद्यार्थीने राहुल गांधीच लक्ष वेधलं.
आदिवासी आश्रम शाळांमध्ये बेडची सुविधा नाहीयेत. पिण्याचं पाणी नाही आहे. त्यामुळेच गडचिरोलीमध्ये विद्यार्थी झोपेत असताना त्यांना मन्यार साप चावला. यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर तिघे अजूनही रुग्णालयात आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटीची तरी मदत करा, सरकारने त्यांना 4 लाखाची मदत केली आहे, असे देखील तिने सांगितले. या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत.त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे.तुम्हाला जे निवेदन दिलं गेलं आहे, त्याचा विचार करा आणि आमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करा,अशी मागणी शेवटी तरुणीने केली.

राहुल गांधींना उपोषणस्थळी येण्याचे आमंत्रण
आदिवासी आश्रमात 13 वर्षापर्यंत आम्ही राहु शकतो त्यानंतर आम्हाला राहायची परवानगी नाही आहे. त्यामुळे आम्हाला किमान 35 वर्षांपर्यंत तरी वयाची अट हवी आहे. मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती एकूण तुम्ही थक्क होऊन जाल. आदिवासी आश्रमात जे विद्यार्थी येतात ते दररोज घरी जात नाही. काहींना जवळपास आहे, पण गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना जाता येत नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही दिवाळीत किंवा एका महिन्याच्या सुट्टीवर गेलो तर आमच्याकडून फिटनेस सर्टीफिकेट मागतात. 

या फिटनेस टेस्टमध्ये आमची प्रेग्नेंन्सी टेस्ट केली जाते. आणि आम्ही जर यावर आवाज उठवला तर, आम्हाला सांगतात तुम्हाला एका महिन्यात कुठला आजार झाला तर,असे सांगितले जाते. यावर मग तुम्ही आदिवासी आश्रमात एक नर्स का नाही ठेवून घेत, असे देखील तिने यावेळी सांगितले. तुम्ही आमच्या आंदोलनाला या आमच्या मुलांची देखील इच्छा आहे, तुम्ही तिथं याव आणि आमच्या प्रश्नांवर बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवावे,असे बोलत तरूणीने राहुल गांधींना आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.