🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीवर डल्ला! पोलिसांवर हल्ला करत गाडी फोडली; हातकडीसह आरोपी पसार

खाकीवर डल्ला! पोलिसांवर हल्ला करत गाडी फोडली; हातकडीसह आरोपी पसार

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून घेऊन जाताना तेलंगणा पोलिसांवर हल्ला करण्यात आला.किनवट-आदिलाबाद मार्गावर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवून हल्ला केला.पोलिसांची गाडी फोडण्यात आली. दगडफेकीचा फायदा घेऊन हातकडीसह आरोपी जंगलात पसार झाला.

शेख बखार याला अटक करून तेलंगणा पोलिसांची गाडी परतीच्या मार्गावर निघाली.मात्र चिखली गावाजवळच्या रस्त्यावर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवली. पोलिसांच्या गाडीवर हल्ला करत दगडफेक करण्यात आली.त्यातून आरोपी शेख बाखर हा हातकडीसह फरार झाला अशी माहिती आहे.दरम्यान सध्या तेलंगणा पोलिसांचे पथक किनवट पोलीस स्थानकात दाखल झाला असून , याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.