मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांना मिळाला कुठल्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार, पण..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६' अधिसूचित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे. अधिसूचनेनुसार, सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात. मात्र,अशा निर्णयामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत. संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी त्या विभागाच्या मंत्र्याचीच राहणार आहे. नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या प्रशासकीय अधिकार व कार्यपद्धतीबाबत स्पष्टता आहे. मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्रे मागवू शकतात आणि संबंधित मंत्री तसेच विभागाच्या सचिवांनी ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.