सांगली:- माजी समाजसेवक आणि व्यावसायिक अनिल चिंतामणी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी होणार रक्षाविसर्जन
सांगली :-आपलेपणाचा जिव्हाळा जपणारे मनमोकळे व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट व्यावसायिक अनिल चिंतामणी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली शहरातून आणि मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल गायकवाड हे आपल्या सहुलयी आणि मनमोकळ्या स्वभावासाठी विशेष ओळखले जात होते. अत्यंत मदतगार वृत्तीच्या गायकवाड यांनी कोणाचेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नसत. बँक क्षेत्रातील कामे असोत, व्यावसायिक दुकानाचे व्यवस्थापन असो वा घराचे उत्कृष्ट फर्निचर, आपल्या प्रत्येक कामात त्यांनी गुणवत्तेचा आणि सचोटीचा ठसा उमटवला. आपल्या या व्यावसायिक कौशल्याचा आणि संपर्काचा उपयोग त्यांनी नेहमी समाजसेवेसाठी केला. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
उद्या सकाळी रक्षाविसर्जन
स्व. अनिल गायकवाड यांच्या पार्थिवाचे रक्षाविसर्जन उद्या सकाळी ९.३० वाजता स्वरूप सिनेमाच्या मागे असलेल्या 'के. सी. सी.' स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
अनिल गायकवाड यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी असून, 'सांगली दर्पण' परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.