विलास घुले मृत्यू प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याची चौकशी करून त्याला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सुषमा घुले यांनी खासगी वृत्तवाहिनीसमोरच विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये असतानाच हा प्रकार घडला. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांची काही महिन्यांपूर्वी अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचीही या प्रकरणात चौकशी करून त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी मागच्या दहा दिवसांपासून घुले कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. मात्र प्रशासनाने या उपोषणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार या ध्वजारोहणासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये दाखल झाल्या. याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विलास घुले यांच्या पत्नी सुषमा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असतानाच विष प्राशन केले. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय हादरले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ सुषमा घुले यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे संतापलेल्या घुले कुटुंबाने उपोषणाची जागा सोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.