मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते वापरत असलेल्या आलिशान डिफेंडर गाडीची चर्चा सुरू आहे. या गाडीवरून आरोप होत असताना जरांगे पाटील यांनी सांगलीत त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ही गाडी एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील चीक महूद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी ही डिफेंडर गाडी जरांगे पाटील यांना वापरण्यासाठी दिली आहे.
मराठा समाजासाठी आंदोलने आणि उपोषणे करताना जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवासातील त्रास कमी व्हावा, या भावनेतून आपण ही गाडी दिल्याचे भोसले यांनी सांगितले. नवीन गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावे, अशी आपली इच्छा होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या डिफेंडर गाडीची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये असून, त्यापैकी दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती भोसले यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.