🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात CBI ची मोठी कारवाई! CGSTच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघे जाळ्यात; 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

महाराष्ट्रात CBI ची मोठी कारवाई! CGSTच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघे जाळ्यात; 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक


रायगड : जिल्ह्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातील लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत लाच घेणाऱ्या तीन प्रमुख व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. 

यामध्ये 2009 च्या बॅचचे IRS अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांथेती, अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि मध्यस्थी करणारा नरेंद्र राजपूत यांचा समावेश आहे. एका दगड उत्खनन कंपनीचा GST आणि रॉयल्टीशी संबंधित जुना वाद मिटवून देण्यासाठी या तिघांनी तब्बल 40 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच CBI च्या पथकाने सापळा रचून तिघांनाही अटक केली.

अटकेच्या कारवाईनंतर CBI च्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या कार्यालयावर आणि इतर ठिकाणांवर छापे मारले. या छाप्यादरम्यान पथकाच्या हाती मोठे घबाड लागले आहे. अधिकाऱ्यांनी तेथून 43 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 90 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने जप्त केले आहेत.

या संपूर्ण कारवाईत CBI ने एकूण 1.33 कोटी रुपयांचा ऐवज आणि रोकड हस्तगत केली आहे. शासकीय पदाचा गैरवापर करून मोठी रक्कम लाच म्हणून स्वीकारणाऱ्या या अधिकाऱ्यांवर झालेली ही कारवाई सध्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. CBI कडून या प्रकरणी पुढील चौकशी आणि तपास वेगाने सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.