🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल


भारतात सॅटेलाइटइंटरनेटची चर्चा आता आणखी रंगण्याची शक्यता आहे. एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीची Starlink सेवा देशात आणण्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीने भारतातील अंतराळ IN-SPACe कडे आपल्या Gen Z सॅटेलाइट नेटवर्कसाठी नव्याने अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या नेटवर्कची खासियत म्हणजे पारंपरिक इंटरनेटसोबतच भविष्यात Direct-to-Device म्हणजेच D2D कनेक्टिव्हिटी देण्याची क्षमता आहे. म्हणजेच काही परिस्थितींमध्ये थेट मोबाइल डिव्हाइसपर्यंत उपग्रहाच्या माध्यमातून कनेक्शन पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Starlink पुन्हा मैदानात

Starlink ने भारतात सेवा सुरू करण्यासाठी याआधीही परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी कंपनीच्या मोठ्या सॅटेलाइट नेटवर्कमधील काही तांत्रिक बाबी आणि वापरल्या जाणाऱ्या स्पेक्ट्रमशी संबंधित मुद्द्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता कंपनीने आपला Gen 2 प्रस्ताव नव्या पद्धतीने सादर केल्याचे सांगितले जात आहे. या योजनेनुसार उपग्रह पृथ्वीपासून साधारण 340 ते 615 किलोमीटर उंचीवर Low Earth Orbit मध्ये फिरतील.

हजारो उपग्रहांचे मोठे जाळे
Starlink च्या Gen 2 योजनेचा आकार पाहिला तर हे नेटवर्क किती मोठे असू शकते, याची कल्पना येते. कंपनीने भविष्यात सुमारे 42 हजार उपग्रह अवकाशात पाठवण्याची योजना आखल्याचे सांगितले जाते. मात्र, सध्या भारतात सुमारे 30 हजार उपग्रहांसाठी मंजुरी मागण्यात आल्याची माहिती आहे. 

एवढ्या मोठ्या संख्येने उपग्रह पृथ्वीभोवती असतील तर दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याची क्षमता वाढू शकते. विशेषतः ज्या ठिकाणी मोबाइल टॉवर किंवा फायबर नेटवर्क पोहोचवणे कठीण आहे, तिथे सॅटेलाइट इंटरनेट उपयोगी ठरू शकते.
Gen 1 ला आधीच मिळाली मंजुरी

Starlinkच्या भारतातील प्रवासात Gen 1 नेटवर्कलाही महत्त्व आहे. जुलै 2025 मध्ये IN-SPACe ने कंपनीच्या 4,408 LEO उपग्रहांच्या Gen 1 समूहाला मंजुरी दिली होती. या नेटवर्कचा मुख्य उद्देश पारंपरिक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणे हा आहे.

मात्र, Gen 2 मध्ये त्यापेक्षा अधिक क्षमता आणि नवीन सुविधा आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. D2D तंत्रज्ञानामुळे भविष्यात उपग्रह आणि मोबाइल उपकरणांमधील कनेक्टिव्हिटीचा वापर आणखी वाढू शकतो.

भारतात स्पर्धा होणार तीव्र
Starlink ला भारतात प्रवेश मिळाल्यास त्याला मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल. Reliance Jio कडून LEO सॅटेलाइट नेटवर्कची तयारी सुरू आहे. याशिवाय Amazon आणि Eutelsat OneWeb यांचाही या क्षेत्रात सहभाग आहे. अशा परिस्थितीत Starlink चे हजारो उपग्रह असलेले मोठे नेटवर्क कंपनीला चांगली आघाडी देऊ शकते. विशेषतः कव्हरेज आणि नेटवर्क क्षमता या बाबतीत Gen 2 महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
D2D वरही लक्ष

Direct-to-Device सेवा सध्या जगभरात चर्चेचा विषय आहे. मोबाइल टॉवर उपलब्ध नसलेल्या ठिकाणी उपग्रहाच्या मदतीने थेट फोनपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याची कल्पना या तंत्रज्ञानामागे आहे. मात्र, भारतात अशा सेवांना अंतिम मंजुरी देताना सरकारला स्पेक्ट्रम, सुरक्षा आणि नियमांचा विचार करावा लागणार आहे. दूरसंचार कंपन्यांचाही या मुद्द्यावर स्वतंत्र दृष्टिकोन आहे. त्यांचे म्हणणे आहे की, थेट ग्राहकांना सेवा देणाऱ्या सॅटेलाइट कंपन्यांनाही योग्य दूरसंचार नियम लागू झाले पाहिजेत.

सरकारसमोर सुरक्षा मोठे आव्हान
सॅटेलाइट इंटरनेटचे फायदे मोठे असले तरी सरकारसमोर काही गंभीर प्रश्न आहेत. राष्ट्रीय सुरक्षा हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. देशाच्या सीमांपासून संवेदनशील भागांपर्यंत सॅटेलाइट नेटवर्कचा वापर होत असल्याने त्यावर योग्य नियंत्रण आणि देखरेख असणे आवश्यक आहे. स्पेक्ट्रमचे वाटप, सुरक्षा मंजुरी आणि D2D सेवांचे नियम यावर अंतिम निर्णय झाल्यानंतरच भारतातील सॅटेलाइट इंटरनेटचा पुढचा मार्ग स्पष्ट होईल.

सध्या Starlink चा Gen 2 साठीचा नवा अर्ज हा भारतातील सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. परवानगी मिळाली तर दुर्गम भागातील इंटरनेटपासून थेट मोबाइल कनेक्टिव्हिटीपर्यंत अनेक गोष्टींचे चित्र बदलू शकते. मात्र, प्रत्यक्ष सेवा कधी सुरू होईल आणि ग्राहकांना त्यासाठी किती खर्च करावा लागेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.