🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे संधी? डॉ. अपूर्वा बसूर सिंधुदुर्ग झेडपीच्या सीईओ

राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे संधी? डॉ. अपूर्वा बसूर सिंधुदुर्ग झेडपीच्या सीईओ


राज्यात गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु आहे. त्यानंतर गुरुवारी राज्यातील 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची आयुक्त, पुण्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहेत तर जव्हार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या डॉ. अपूर्वा बसूर यांची सिंधुदुर्ग झेडपीच्या सीईओ पदावर बदली करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये गजेंद्र बावणे यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. तर यापूर्वी डहाणू येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या विशाल खत्री यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषद येथे बदली करण्यात आली आहे.

2024 बॅचच्या IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
डोनुरू अनन्या रेड्डी यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू, पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, कुश मोटवानी यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा उपविभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यासोबतच आकाश वर्मा यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथे तर नंदला साईकिरण यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा उपविभाग येथे तर योगेश कुमार मीना यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव उपविभाग येथे तर शिवांश सिंह प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.