🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,'; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन

'आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,'; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन


पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो महापुरुषांच्या छायाचित्रांसोबत लावण्यात आल्याने सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी संबंधित फोटो हटवल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी या मुद्द्यावर भूमिका मांडत सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला हवा, मात्र तो छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या रांगेत नसावा, असं म्हटलं.

'बाळासाहेबांचा फोटो काढा'

सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना शिवसेना भवनातील छायाचित्रांचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या वर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना भवनामधील फोटो प्रोटोकॉलनुसार आहेत का, याचं उत्तर राज ठाकरेंनी द्यावं, असंही त्यांनी म्हटलं. 

बाळासाहेब ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख होते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च आदराचं स्थान असलेले व्यक्तिमत्त्व आहे, असा युक्तिवाद सदावर्तेंनी केला. त्यामुळे दोघांच्या प्रतिमांच्या मांडणीवरून त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

'15 दिवसांची मुदत देतो'
सदावर्ते यांनी पुढे आक्रमक भूमिका घेत शिवसेना भवनातील संबंधित फोटो हटवण्याची मागणी केली. 15 दिवसांत हा फोटो काढला नाही, तर आपण स्वतः न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. गरज पडल्यास उपोषण करण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.  'शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही', अशी भूमिका मांडत सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, पुण्यातील फोटो प्रकरणामुळे सुरू झालेला वाद आता मनसे, भाजप आणि ठाकरे गटाच्या राजकारणाशी जोडला जात असल्याने आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी थेट शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा दाखला देत राज ठाकरेंना सवाल केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.