🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हजारो कोटींचा मालक, पण पायात 200 रुपयांची स्लिपर! सुपरस्टारचा डोंगरावर फिरतानाचा फोटो व्हायरल, चाहतेही हैराण

हजारो कोटींचा मालक, पण पायात 200 रुपयांची स्लिपर! सुपरस्टारचा डोंगरावर फिरतानाचा फोटो व्हायरल, चाहतेही हैराण


सुपरस्टार म्हटले की त्यांच्या लग्झरी आयुष्याची चांगलीच चर्चा सुरु होते. अभिनेत्याचे राहणे, खाणे, कपडे, गाड्या आणि घरे हे सर्वच लक्ष वेधून घेत असते. पण एक सुपरस्टार असा आहे ज्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.

पण त्याचा साधेपणा नेहमीच सर्वांची मने जिंकून घेतो. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून सुपरस्टार रजनिकांत आहेत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये ते गुरू महावतार बाबाजींच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. पण फोटोमधील साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

रिपोर्ट्सनुसार रजनीकांत ५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. करोडोंची संपत्ती असूनही ते साधे जीवन जगतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रजनीकांत यांचा एक फोटो खूप शेअर केला जात आहे. या फोटोमध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून डोंगरावर चालताना दिसत आहेत. त्यांनी पायांमध्ये साधी चप्पल घातली आहे, ज्याची किंमत सुमारे 200 ते 500 रुपये असेल. 

व्हायरल फोटोमध्ये ते आपल्या गुरूच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. या फोटोमध्ये रजनीकांत यांचा अंदाज अत्यंत साधा आणि नम्र दिसत आहे, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी झलक दाखवतो. फोटो व्हायरल झाल्यानंतर हजारो युजर्सनी लाईक आणि शेअर केला आहे. अनेक नेटिझन्सनी कमेंट्समध्ये केल्या आहेत. एका यूजरने, इतका मोठी स्टारडम असूनही रजनीकांत आजही आपल्या गुरूंबद्दल एवढा आदर आणि श्रद्धा दाखवतात, हे खरोखर कौतुकास्पद आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "हेच खरे सुपरस्टार आहेत, जे पडद्यामागेही आपल्या मुळांशी आणि संस्कारांशी जोडलेले राहतात."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.