🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

3 तोळ्यांची सोन्याची चैन बैलाच्या पोटात! 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शस्त्रक्रिया यशस्वी,चर्चांना उधाण!

3 तोळ्यांची सोन्याची चैन बैलाच्या पोटात! 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शस्त्रक्रिया यशस्वी,चर्चांना उधाण!


नाशिक : बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी नैवेद्य भरवताना एका बैलाने सोन्याची साखळी गिळल्याची अजब आणि धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली. मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांच्या घरात हा प्रकार घडला.

सुमारे 3 तोळे वजनाची ही सोन्याची पोत असून तिची आजची किंमत साधारण 4,71,000 रुपये आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंब आपल्या लाडक्या बैलाच्या आरोग्याबाबत अत्यंत चिंतेत पडले होते. नक्की कोणत्या बैलाने दागिना गिळला आहे, याबाबत सुरुवातीला बोरसे कुटुंबाचा गोंधळ उडाला होता. दोन्ही बैलांपैकी कोणाच्या पोटात पोत गेली आहे हे ओळखणे कठीण झाले होते. शेवटी त्यांनी जनावरांना चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी आधुनिक एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी केली असता, एका बैलाच्या पोटात सोन्याची पोत अडकल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर तब्बल 10 दिवसांनी डॉक्टरांच्या पथकाने बैलावर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आणि बैलाच्या पोटातून सुरक्षितपणे ती सोन्याची साखळी बाहेर काढली.

या यशस्वी उपचारांमुळे बैलाला नवजीवन मिळाले असून त्याचा जीव वाचला आहे. तसेच शेतकरी शिवाजी बोरसे यांनाही त्यांची मौल्यवान सोन्याची पोत परत मिळाल्याने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कौशल्यामुळे बोरसे कुटुंबाने डॉक्टरांचे मनापासून आभार मानले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.