🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'वेलकम' फेम अभिनेते मुश्ताक खान काळाच्या पडद्याआड! ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'वेलकम' फेम अभिनेते मुश्ताक खान काळाच्या पडद्याआड! ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर मुश्ताक खान यांचे २४ सप्टेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. मुश्ताक खान गेल्या काही काळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते.

त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कर्करोगावर सुरू होते उपचार मिळालेल्या माहितीनुसार, मुश्ताक खान कॅन्सरच्या गंभीर आजाराने ग्रस्त होते आणि त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. उपचारादरम्यानच त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जवळचे मित्र आणि विनोदी कलाकार सुनील पाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.

कोणत्याही गॉडफादरशिवाय कमावलं नाव

मुश्ताक खान यांचा जन्म मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर या छोट्या गावात एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मुंबईत येऊन आपल्या करिअरला सुरुवात केली. कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय त्यांनी स्वतःच्या हिंमतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांत काम केले.

३० वर्षांची यशस्वी कारकीर्द
गेल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत मुश्ताक खान यांनी अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये १९९३ मधील 'हम हैं राही प्यार के', २००१ मधील 'जोडी नं. १' आणि २००७ मधील 'वेलकम' हे चित्रपट विशेष गाजले. 'वेलकम' चित्रपटातील त्यांची अपंग हॉकी खेळाडूची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. चित्रपटांमधील त्यांच्या दर्जेदार भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.