ईश्वरपूर : जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचान्यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले, अशी माहिती एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
याप्रकरणी परिरक्षण भूगापक श्रीगती सोनाली सचिन आवटी (वय ४७, रा. आष्टा) आणि गुख्यालय राहायक सुनील गणपती पाटील (वय ४८, रा. कोडोली) यांना ताब्यात घेण्यात आले असून, हे दोघेही उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय ईश्वरपूर येथे कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांनी स्वतःच्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दिला होता. सदर काम करून देण्यासाठी आरोपी सुनील पाटील यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती, तर चर्चेअंती सोनाली आवटी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. पाप्रकरणी तक्रारदाराने १९ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली येथे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर रोजी पंचांसगक्ष केलेल्या पडताळणीत लाप गागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २२ सप्टेंबर २०२६ रोजी रचलेल्या सापळ्यात ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना पंचांसमक्ष रंगेहात पकडून दुपारी १:०५ वाजता ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ व्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक यास्मिन इनामदार व त्यांच्या पथकाने, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.