🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेकायदा साउंड व लेझर सिस्टीमवर BIS कायद्यानुसार कारवाई व्हावी*: ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा

बेकायदा साउंड व लेझर सिस्टीमवर BIS कायद्यानुसार कारवाई व्हावी*: ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा


कोणतीही साउंड सिस्टीम आणि लेझर लाईट सिस्टीम जोडणी करणे, उत्पाद्दीत करणे आणि विक्री करण्यापूर्वी विक्रेत्याने त्यास बी. आय. एस. कडून परवाना घेणे बंधनकारक आहे. डीजे सिस्टीम उभारण्यासाठी अनेक स्पीकर, एम्प्लिफायर आणि मिक्सर सेरीज मध्ये जोडणी करून उच्च डेसिबल क्षमतेची नवीन साउंड सिस्टीम उत्पाद्दीत-विक्री केली जाते. त्यास बी. आय. एस. मानांकन नसते आणि मिळू देखील शकत नाही, कारण त्या सिस्टीम्स बीआयएस ने घालून दिलेल्या मर्यादा आणि गुणवत्ता चाचणीत पास देखील होऊ शकत नाहीत.

बी.आय.एस. कायदा २०१६ नुसार केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालया अंतर्गत  ब्युरो ऑफ इंडिअन स्टॅंडर्ड ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था काम करते. फक्त वस्तूच नव्हे तर विविध सेवांसाठी देखील मानके निर्धारित करणे, तपासण्या करणे, परवाने देणे, धाडी टाकून जप्ती व फौजदारी कारवाई करणे इत्यादी काम ही संस्था करते.   

अशी परवाना रहित बेकायदा साउंड सिस्टीम आणि डोळ्यांना इजा होईल अशी लाईट सिस्टीम जप्त करण्याचा अधिकार बीआयएस ला आहे. त्याच्या उत्पादकांवर आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा अधिकार बीआयएस ला आहे. बीआयएस ची पुण्यासह विभागीय कार्यालये आहेत. कायदा सक्षम असला तरी अपुरे मनुष्यबळ, पोलिसांना याबाबत नसलेली माहिती आणि प्रत्येक जिल्ह्यात बीआयएस ची कार्यालये नसल्याने कारवाई दिसत नाही. 

- ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा,
ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.