🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगाव अपहरण प्रकरण: नवजात बालकाला पिशवीत भरून पळवणाऱ्या भोंदू परिचारिकेला ७ वर्षे सश्रम कारावास; सांगली न्यायालयाचा दणका

तासगाव अपहरण प्रकरण: नवजात बालकाला पिशवीत भरून पळवणाऱ्या भोंदू परिचारिकेला ७ वर्षे सश्रम कारावास; सांगली न्यायालयाचा दणका

तासगाव :-​तासगाव येथील सरस्वती आनंद हॉस्पिटलमधून अवघ्या काही तासांच्या नवजात बालकाचे अपहरण करणाऱ्या स्वाती छबुराव माने उर्फ लक्ष्मी मच्छींद्र पवार (वय २८, रा. रामानंदनगर, किर्लोस्करवाडी) या आरोपी परिचारिकेला सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अपहरण आणि बालकाचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी तिला ७ वर्षे सश्रम कारावास व दंडाची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व्ही. डी. निंबाळकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
​घटनेचा थरार आणि न्यायालयाचा निकाल

​शिक्षेचा तपशील: मुख्य अपहरणाच्या गुन्ह्यासाठी ७ वर्षे सश्रम कारावास व ३,००० रुपये दंड (दंड न भरल्यास २ महिने साधी कैद). तसेच जुवेनाइल जस्टिस ॲक्टनुसार अतिरिक्त ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

​अपहरणाचा बनाव: २२ जुलै २०२२ रोजी दाखल झालेल्या प्रसुती महिलेच्या अवघ्या काही तासांच्या बाळाला 'डॉक्टरांकडे घेऊन जाते' असा बनाव रचून आरोपी परिचारिकेने पिशवीत भरून पळवून नेले होते.

​सीटीव्ही आणि रिक्षाचालकाची सतर्कता: तासगाव पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत मेडिकलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. अप्पे रिक्षाचालकाने पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याची माहिती देताच पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून बाळाला सुखरूप ताब्यात घेतले.
​डीएनए चाचणी अन् निर्णायक पुरावे: बाळाच्या पायावरील हॉस्पिटल टॅग आणि कोल्हापूर न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा (FSL) डीएनए (DNA) रिपोर्ट या प्रकरणातील मुख्य पुरावा ठरला.

​१७ साक्षीदारांची साक्ष: अतिरिक्त सरकारी अभियोक्ता माधव कुलकर्णी व आरती देशपांडे यांनी न्यायालयात मजबूत बाजू मांडली. बाळाची आई, आजी, डॉ. अंजली पाटील आणि रिक्षाचालक यांची साक्ष या प्रकरणात निर्णायक ठरली.
​तपास अंमलदार एस. एन. गुरुव यांच्यासह तासगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या जलद व अचूक तपासामुळे आरोपी परिचारिकेला तिचे पाप महागात पडले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.