🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप ईश्वरपूर न्यायालयाचा निकाल

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप ईश्वरपूर न्यायालयाचा निकाल


सांगली :  मांगले चेथील प्राप्जका मंगेश कांबळे हत्या प्रकरणात दोषी ठरलेला पती मंगेश चंद्रकांत कावळे यास ईश्वरपुर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ देविदास एच. केळूसकर यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये आरोपीला या प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे.

शिराळा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या माहितीनुसार, २० मार्च २०२५ रोजी राहत्या घरी आरोपी मंगेश कांबळे याने चा रित्र्याच्या संशयावरून पत्नी प्राजक्ता हिचा ओढणीने गळा आवळून खून केला होता. ही धक्कादायक घटना त्यांचा मुलगा शिवम कांबळे याने प्रत्यक्ष पाहिली होती. हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह खोलीत असलेल्या एका पायाच्या पेटीत बंद करून ठेवला, पेटीचे दोन्ही दरवाजे लावले आणि खोलीला कुलूप ठोकून घटनास्थळावरून पळ काढला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. सतीश विश्वास केकाणीस यांनी बाजू मांडली. प्रकरणात एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये मयताची आई रंजना अर्जुन चांदणे, प्रत्यक्षदर्शी मुलगा शिवम कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मारूती बनसोडे व डॉ. अनिरुद्ध सतीश काकडे आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी अत्यंत निर्णायक ठरल्या.
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारे हे अत्यंत क्रूर कृत्य असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची जोरदार मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली होती या खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात आणि पैरवी कामात सांगली कोर्ट पैरवी विभागाचे संहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनंदा सुरेश निकम व इतर सहकाऱ्याऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.