जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीमध्ये पायलट पदासाठी कंत्राटी तत्त्वावर भरती जाहीर झाली असून पात्र उमेदवारांना १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी अंतर्गत सागरी विभागात 'पायलट' या उच्च श्रेणीतील पदासाठी कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे पात्र आणि अनुभवी उमेदवारांना दरमहा १ लाख ५० हजार ते ३ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना १२ ऑक्टोबरपर्यंत ई-मेल किंवा पोस्टाद्वारे अर्ज सादर करता येणार आहेत.या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 'मास्टर (FG) सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी' (Master FG Certificate of Competency) असणे आवश्यक आहे. तसेच परदेशी जाणाऱ्या जहाजांवर चीफ ऑफिसर किंवा त्याहून वरिष्ठ पदावर काम करण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली असून, शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 'harbourmaster@jnport.gov.in' या ई-मेल आयडीवर पाठवता येतील. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, प्रशासन भवन, न्हावा शेवा, नवी मुंबई येथे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जातील. प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.