पुणे :- पुण्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. एका तरुणीचा प्रताप पाहून पोलिसही अचंबित झाले आहे. एका 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 17 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीवर करण्यात आला आहे. कॅफेमध्ये नेऊन या तरुणीने 17 वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
अत्याचाराचा कथित गुन्हा दाखल झालेली तरुणी पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात राहते. या 21 वर्षीय तरुणीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 17 वर्षीय मुलावर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधित तरुणीने 17 वर्षीय मुलाशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.संबधीत तरुणी मुलाच्या घरी गेली होती आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ती त्याला तळेगावमधील एका कॅफेमध्ये घेऊन गेली. याच ठिकाणी कथित लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोघेही नातेवाईक असून गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यासह संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.